कोहमारा-गोंदिया महामार्गावर ट्रक -दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 14:10 IST2020-04-17T14:09:41+5:302020-04-17T14:10:01+5:30
कोहमारा गोंदिया महामार्गावर परसोडी सडक गावाजवळ झालेल्या ट्रक- दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१७) सकाळी घडली.

कोहमारा-गोंदिया महामार्गावर ट्रक -दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोहमारा गोंदिया महामार्गावर परसोडी सडक गावाजवळ झालेल्या ट्रक- दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१७) सकाळी घडली. सविस्तर वृत्त असे की, गोंदियावरून महाराष्ट्र शासनातर्फे तांदळाचा पुरवठा करणारे ट्रक मोठ्या प्रमाणात जात असून यापैकीच ट्रक क्रमांक एम एच एचडी 5640 व गडचिरोली जिल्ह्यातील चिखली या आपल्या सासुरवाडी वरून सदर मयत व्यक्ती दुचाकी होंडा कंपनीची ड्रीमयुगा क्रमांक एम एच 35 ए एफ 8154 ने आमगाव या आपल्या स्वगावी जात होता. दरम्यान झालेल्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच ठार झाला असून त्याच्या आधार कार्ड वरून त्याचे नाव दुष्यंतकुमार भागवत नागपुरे 61 राहणार मॉडेल कॉलोनी आमगाव असे असून त्याचे वडील मध्यप्रदेशचे माजी आमदार आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल कुंम्भरे करीत आहेत.