शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर-दुचाकीच्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरकडून गोंदियाकडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक टीएन ०४-एसी १७९४ ने तिरोडाकडून आंधळगावकडे (भंडारा) जात असलेल्या हरिदयाल खैरे यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३६-एई ८७३६ ला धडक दिली. यामध्ये खैरे यांचा उजवा पाय जांघेपासून तुटल्याने खूप रक्तस्त्राव झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील धरमदास बाहे (५२,रा.भंडारा) दुचाकीसोबत सुमारे २५ फूट फरफटत गेले.

ठळक मुद्देसरांडी जवळील घटना : दोन जण गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यातील ग्राम सरांडी जवळ कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात १ जण जागीच ठार झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.१५) सकाळी ८.३० वाजतादरम्यान तुमसर मार्गावरील सरांडी वळणावर घडली. मृताचे नाव हरिदयाल मोतीराम खैरे (५२,रा. आंधळगाव) असे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरकडून गोंदियाकडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक टीएन ०४-एसी १७९४ ने तिरोडाकडून आंधळगावकडे (भंडारा) जात असलेल्या हरिदयाल खैरे यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३६-एई ८७३६ ला धडक दिली. यामध्ये खैरे यांचा उजवा पाय जांघेपासून तुटल्याने खूप रक्तस्त्राव झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील धरमदास बाहे (५२,रा.भंडारा) दुचाकीसोबत सुमारे २५ फूट फरफटत गेले. याप्रसंगी मागून येणारे गोरेगाव येथील वामनराव तुळशीराम राऊत यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३५-एएन ०९३० ला धडक दिली. वामन राऊत हे तुमसर येथे रेल्वे विभागात खलासी पदावर कार्यरत असून ते सकाळी आपल्या गावावरून कामावर जात असल्याचे समजते.या दुर्घटनेची माहिती सरांडी गावचे सरपंच माणीक वाणी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून तिरोडा पोलिसांना माहिती दिली. जखमींवर तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून गोंदियाला पुढील उपचाराकरीता पाठवण्यात आले. अपघात होताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

टॅग्स :Accidentअपघात