शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १०० स्वॅब नमुने आले निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र मागील पाच सहा दिवस प्रयोगशाळेकडून नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने जिल्हावासीयांची आणि आरोग्य विभागाची सुध्दा चिंता वाढली होती. त्यानंतर बुधवारी जिल्ह्यातील ६४ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला.

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिलासा : पुन्हा १५ जणांचे स्वॅब नमुने पाठविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत पाठविलेल्या एकूण १०५ नमुन्यांपैकी गुरूवारपर्यंत १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर गुरूवारी पुन्हा १५ स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. जिल्ह्यातील आतापर्यत शंभर स्वॅब नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र मागील पाच सहा दिवस प्रयोगशाळेकडून नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने जिल्हावासीयांची आणि आरोग्य विभागाची सुध्दा चिंता वाढली होती. त्यानंतर बुधवारी जिल्ह्यातील ६४ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला.तर गुरूवारी ४४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आधी पाठविलेले ५ आणि गुरूवारी (दि.९) पाठविलेले १५ अशा एकूण २० स्वॅब नमुन्यांचा अहवाल आता प्राप्त होणे बाकी आहे. तर एक नमुना आधीच पाझिटिव्ह आला आहे.दरम्यान आत्तापर्यंत पाठविलेले शंभर नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना सुध्दा मोठा दिलासा मिळाला आहे.अलगीकरणाचा कालावधी संपलेल्यांवर नजरजिल्ह्यात २५१ व्यक्ती विदेशातून प्रवास करून जिल्ह्यात आल्यात.त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा १४ दिवसांचा वास्तव्याच्या ठिकाणी अलगिकरणात राहण्याचा कालावधी संपलेला आहे. अलगीकरणाचा कालावधी जरी संपला असला तरी त्यांनी स्वत:हून अलगिकरणातच राहावे.आपल्या कुटूंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी.तसेच त्यांच्यावर आरोग्य विभागाची सुध्दा नजर आहे.८६ जण शासकीय अलगीकरण केंद्रातदिल्ली निजामुद्दीन येथील एका धार्मिक कार्यक्रमा दरम्यान दिल्ली प्रवासाचा संदर्भ असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना शासकीय अलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना शासकीय अलीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील यात दोन शासकीय अलगीकरण कक्षात आत्तापर्यंत ८६ जणांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज ७६ आणि लहीटोला १० अशा एकूण ८६ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ.संगिता पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य