दीड पट वेतनाला मुदतवाढ

By Admin | Updated: June 4, 2014 00:10 IST2014-06-04T00:10:15+5:302014-06-04T00:10:15+5:30

नक्षलग्रस्त भागात काम करणार्‍या पोलीस व राज्य राखीव पोलीस बलाच्या जवानांना दीडपट वेतन देण्याची योजना राज्य शासनाने २0१0 पासून सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या योजनेला मुदतवाढ

One-and-a-half hour increments | दीड पट वेतनाला मुदतवाढ

दीड पट वेतनाला मुदतवाढ

पोलिसांत आनंद : अनेकांची नक्षल भागास पसंती
गोंदिया : नक्षलग्रस्त भागात काम करणार्‍या पोलीस व राज्य राखीव पोलीस बलाच्या जवानांना दीडपट वेतन देण्याची योजना राज्य शासनाने २0१0 पासून सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असल्याने पोलिसांना आता ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत दीडपड वेतन मिळणार आहे.
राज्यातील गोंदिया व गडचिरोली हे दोन जिल्हे नक्षलवादसंबंधात अतिशय संवेदनशील मानले जातात. हे दोन्ही जिल्हे छत्तीसगड राज्याला लागून असून घनदाट जंगलांनी व्यापले आहेत. या ठिकाणी नेहमी नक्षल कारवाया घडत राहतात. नक्षल्यांच्या भीतीने गोंदिया जिल्ह्यात काम करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्ग तयार होत नाही. बरेचसे अधिकारी जिल्ह्यातील बदली झाल्यास ते रूजू न होता दुसर्‍या ठिकाणी बदली करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे प्रशासनातील कर्मचार्‍यांसाठी शासनाने एकस्तर पदोन्नती ही योजना सुरू केली आहे. मुदत संपूनही पाच महिने मुदतवाढ न दिल्याने मुदतवाढ मिळणार की नाही? याविषयी शंका उपस्थित केली जात होती. मुदतवाढीमुळे पोलीस कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील पोलिसांना नक्षल्यासोबत दोन हात करून लढावे लागते. पावलोपावली धोका पत्करावा लागतो. अत्यंत कठीण परिस्थतीत राहून नक्षल्यांशी सामना करावा लागतो. वेळप्रसंगी जीवही गमवावा लागत असल्याच्या घटना नेहमी घडत असतात. जीवाची बाजी लावून नक्षल्यांपासून जनतेचे संरक्षण करणार्‍या पोलीस दलांचे मनोधैर्य वाढावे यासाठी जानेवारी २0१0 पासून राज्य शासनाने नक्षलग्रस्त भागातील अतिसंवेदनशील पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे, पोलीस दूरक्षेत्र व इतर कार्यालयामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दीडपट वेतन देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ पोलिसांबरोबरच राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्यांना देण्यात येत आहे.
या योजनेची मुदत एक वर्षाची राहत असून शासन दरवर्षी या योजनाला मुदतवाढ देते. या योजनेची मुदत यावर्षी संपलेली होती. त्यामुळे शासनाने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय ३१ मे रोजी घेतला आहे. त्यामुळे ही योजना आता ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत सुरू राहणार आहे.
राज्य वार्ता विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ ते राज्यात कोठेही कार्यरत असले तरी लागू राहते. गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामाचे स्वरूप अत्यंत जोखमीचे आहे. त्यामुळे अतिसंवेदनशील भागात कार्यरत असलेल्या राज्य गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याच्या उद्देशाने एकस्तर पदोन्नतीचा लाभ किंवा दीड पट दराने वेतन अधिक महागाई भत्ता यापैकी जे जास्त असल ते देण्यात येणार आहे. नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावत असेपर्यंत राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनाही दीड पट वेतनाचा लाभ दिला जाणार आहे. दीडपट वेतन घेणार्‍या कर्मचार्‍यांना मात्र सामान्य प्रशासन विभागाकडून लागू झालेल्या आर्थिक सवलती देण्यात येऊ नये, असे स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. नियमांचा भंग करणार्‍या अधिकारी किंवा कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: One-and-a-half hour increments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.