जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:30 IST2018-07-26T21:29:39+5:302018-07-26T21:30:50+5:30

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र यामुळे शहरवासीयांची आणि वाहन चालकांची कोंडी होणार होती.

The old flyover will continue to transport | जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणार

जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणार

ठळक मुद्देबैठकीत निर्णय : पुलाचे करणार स्ट्रक्चर आॅडिट,अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र यामुळे शहरवासीयांची आणि वाहन चालकांची कोंडी होणार होती. ही समस्या ओळखत आ. गोपालदास अग्रवाल यांनी गुरूवारी (दि.२६) नागपूर येथे रेल्वे आणि संबंधित विभागाची बैठक घेतली. सध्या जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करु नये अशी मागणी केली. ती रेल्वे विभागाने सध्या मान्य केली आहे. त्यामुळे जुन्या उड्डाणपुलावरुन हलक्या वाहनाची वाहतूक सुरू राहणार आहे.
गोंदिया येथील जुन्या उड्डाणपुलाच्या विषयावर गुरूवारी नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बांधकाम विभागाचे राज्य सचिव अजित सगणे, मुख्य अभियंता देबडवार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे उपकार्यकारी अभियंता सौरभ गुप्ता, मंडळ अभियंता नारायणलाल, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण उपस्थित होते. आ.अग्रवाल यांनी जुना उड्डाणपुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास शहरातील नागरिकांची अडचण होईल. शिवाय वाहतुकीची कोंडी होईल. तसेच नवीन उड्डाणपुलावर पादचारी पुलाची व्यवस्था नसल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचण निर्माण होईल. शिवाय अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जुना उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद न करता नागरिकांना ये-जा करण्यासाठी व हलक्या वाहनाना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी लावून धरली. जुना उड्डाण पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट त्वरीत करुन आवश्यक दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या पुलाचा स्ट्रक्चरल आॅडिट रिर्पोट येईपर्यंत या पुलावरुन हलक्या वाहनाची वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, डीआरएम शोभना बंडोपाध्याय यांना देण्यात आली.

Web Title: The old flyover will continue to transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.