शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

ओबीसी आयोगाच्या विधेयकाला काँग्रेस-राकाँचा विरोध का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:18 AM

ओबीसी समाजाकरीता राज्यात स्वतंत्र मंत्रालय बनविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. केंद्रात ओबीसी आयोगाचे बिल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडले. लोकसभेत ते पास झाले. राज्यसभेत भाजप व मित्रपक्ष खासदारांची संख्या नव्हती.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा सवाल : अर्जुनी-मोरगाव येथील प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : ओबीसी समाजाकरीता राज्यात स्वतंत्र मंत्रालय बनविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. केंद्रात ओबीसी आयोगाचे बिल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडले. लोकसभेत ते पास झाले. राज्यसभेत भाजप व मित्रपक्ष खासदारांची संख्या नव्हती. राज्यसभेत ते बिल मांडल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी विरोधात मतदान करुन ते बिल पराजित केले. शेवटी वेगवेगळ्या पक्षाची मदत घेतली. काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाला बाजूला टाकत राज्यसभेतून ओबीसी आयोग तयार केला. देशात पहिल्यांदा ओबीसींना संवैधानिक दर्जा देण्याचे काम मोदींने केले. आता ओबीसींचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीेने तेव्हा ओबीसी विधेयकाला विरोध का केला ?असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.स्थानिक जि.प. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राजकुमार बडोले, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आ. परिणय फुके, आ. सुधाकर देशमुख व भाजपचे कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले महाराष्ट्र व केंद्रातील सरकार हे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांच्या पाठिशी राहणारे आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील एक लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाणार नाही. तोपर्यंत हे काम थांबणार नाही. काँग्रेसने मुंबईतील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आम्ही ते केलं नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दुष्काळ पडला. अनेक भागात रोवणी होऊ शकली नाही. मावा, तुडतुडा या कीडीने पीक उध्वस्त केले. त्यांना मदत देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी २०० रुपये बोनस देत आहेत. शेतकऱ्याच्या मदतीचा पैसा जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. अचानक आचार संहिता लागली. आम्ही निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक तात्काळ मदतीची राशी जमा करु असे म्हणाले. २०११-१२ पासून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. ही सगळी शिष्यवृत्ती आमच्या सरकारने दिली. ओबीसींच्या शिष्यवृत्तीचा बँकलॉग भरुन काढला. आता वेळेवर देत आहोत. झाशीनगर उपसा योजना, इटियाडोह धरणाचा उजवा कालव्याचे काम हाती घेणार आहोत. या जिल्ह्यात पर्यटनाला वाव आहे. यापासून रोजगार निर्मिती होणार आहे. मोदींजीजवळ कोणतीच संपत्ती नाही. देशाची १२५ कोटी जनता हिच त्यांची संपत्ती आहे.स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतर अनेकांना स्वत:ची घरे नाहीत. केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना आणली. २०१२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा त्यांचा संकल्प आहे. मात्र राज्य शासनाला २०१९ पर्यंत घरे देण्याच्या विचारात आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील १ लाख घरांचा यात समावेश आहे. याशिवाय त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक निर्णयाची माहिती दिली.इंदू मिलचा प्रश्न भाजपने मार्गी लावला-आठवलेराज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांसाठी काँग्रेसचे पैसा खर्च केला नाही. लंडन येथील घर, महू व इंदू मिलचे ठिकाणी भव्य स्मारक तयार करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. खऱ्या अर्थाने आंबेडकरांनी संविधानासाठी केलेले कष्ट भाजपानेच ओळखले. भाजपच्या पाठीत खंजीर खुपूसून नाना पटोले यांनी भाजपचा विश्वासघात केला आहे. मात्र भाजप सरकार हे दलित विरोधी आहे. असा खोटा अप्रचार विरोधक करीत आहेत. उलट दलित, आदिवासी, ओबीसी आरक्षणाला संरक्षण देणारे हे सरकार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपा