बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांचा आकडा दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:06+5:302021-02-06T04:54:06+5:30

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत असून, नवीन बाधितांची संख्या कमी झालेली आहे. यामुळेच जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ...

The number of survivors is more than double the number of victims | बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांचा आकडा दुप्पट

बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांचा आकडा दुप्पट

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत असून, नवीन बाधितांची संख्या कमी झालेली आहे. यामुळेच जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ५) बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट दिसून आली. शुक्रवारी जिल्ह्यात ८ नवीन बाधितांची भर पडलेली असतानाच १७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४,२३१ एवढी झाली असून १३,९५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता ९४ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात उरले आहेत.

शु्क्रवारी आढ‌ळून आलेल्या ८ नवीन बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील ७ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ रुग्ण आहे. तसेच कोरोनावर मात करणाऱ्या १७ रुग्णांमध्ये सर्व रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आता ९४ क्रियाशील रुग्ण उरले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ६१, तिरोडा ८, गोरेगाव ४, आमगाव ११, देवरी ३, सडक-अर्जुनी १, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ५ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे. विशेष म्हणजे, यातील ४७ रुग्ण घरीच अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३१, तिरोडा ४, गोरेगाव २, आमगाव ६, देवरी १, सडक-अर्जुनी १, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३ रुग्ण आहेत.

--------------------------

आतापर्यंत १,३१,९६८ कोरोना चाचण्या

जिल्ह्यात आतापर्यंत १,३१,९६८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६६,१८२ आरटीपीसीआर चाचण्या असून, यातील ८३९९ पॉझिटिव्ह तर ५४,५५८ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तसेच ६५,७८६ रॅपिड ॲंटिजन चाचण्या झाल्या असून, ६११३ पॉझिटिव्ह तर ५९,६७३ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

--------------------------

आतापर्यंत १८३ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०२, तिरोडा २३, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर १.२० टक्के असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६.७६ टक्के आहे तसेच रुग्ण द्विगुणित गती ३८०.२ दिवस नोंदविण्यात आली आहे.

Web Title: The number of survivors is more than double the number of victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.