कोरोनाविरुध्दच्या लढ्यासाठी आता अँटीजेन रॅपिड टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:57+5:30

शहरातील कुंभारेनगर परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. सध्या या भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने या भागात मागील पाच दिवसांपासून अँटिजेन रॅपिड टेस्ट सुरू केली आहे.

Now the antigen rapid test for the fight against corona | कोरोनाविरुध्दच्या लढ्यासाठी आता अँटीजेन रॅपिड टेस्ट

कोरोनाविरुध्दच्या लढ्यासाठी आता अँटीजेन रॅपिड टेस्ट

ठळक मुद्देआणखी दहा हजार किट मागविल्या : तपासणीचे प्रमाण वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युध्द पातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. याच अंतर्गत मागील पाच दिवसांपासून जिल्हा अँटीजेन रॅपिड टेस्ट सुरू करण्यात आली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दीड हजार टेस्ट किट मागविण्यात आल्या होत्या. या टेस्टचे प्रमाण वाढवून कोरोनाला हरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी १० हजार अँटीजेन रॅपिड टेस्ट किट मागविण्यात आल्याची माहिती आहे.
शहरातील कुंभारेनगर परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. सध्या या भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने या भागात मागील पाच दिवसांपासून अँटिजेन रॅपिड टेस्ट सुरू केली आहे. सुरूवातीला कुंभारेनगर येथे प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प रावबून त्यानंतर याची जिल्हाभरात अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी घेतला आहे. अँटीजेन रॅपिड टेस्टव्दारे कोरोनाचे अर्धा तासात निदान होत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर त्वरीत उपचार करुन कोरोनाचा वाढता संसर्ग टाळणे शक्य आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने पहिल्या टप्प्यात दीड हजार अँटीजेन रॅपिड टेस्ट किट मागविल्या होत्या. आतापर्यंत ७०० जणांची अँटीजेन रॅपिड किटच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी या टेस्टचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. यासाठी आणखी १० हजार अँटीजेन रॅपिड किट आरोग्य विभागाने मागविल्या आहे. येत्या आठवडभरात या किट प्राप्त होणार असून त्यानंतर ही तपासणी मोहीम अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी आता अँटीजेन रॅपिड टेस्टचे शस्त्र हाती घेण्यात आले असून या माध्यमातून कोरोनाला जिल्ह्यातून पूर्णपणे हद्दपार केले जाणार आहे.

अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्याची स्थिती बरी
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३१ कोरोना बाधित आढळले आहे. यापैकी १९९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या स्थितीत केवळ २९ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला बऱ्याच प्रमाणात यश आल्याचे चित्र आहे. तर इतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र आहे.

Web Title: Now the antigen rapid test for the fight against corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.