शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

ही वेळ टीका करण्याची नव्हे, तर संकटाशी लढण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:27 IST

गोंदिया : कोविडच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णावाढ झाली; मात्र या संकटाचा सामना जिल्ह्यातील यंत्रणेने सक्षम केला आहे. ...

गोंदिया : कोविडच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णावाढ झाली; मात्र या संकटाचा सामना जिल्ह्यातील यंत्रणेने सक्षम केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडच्या परिस्थितीत आता सुधारणा झाली आहे. या संकटाचा सामना करीत असताना यंत्रणेच्या काही त्रुटी आणि चुका राहिल्या असतील, मात्र ही चुका काढण्याची किंवा टीका करण्याची वेळ नाही तर आलेल्या संकटाशी सर्वांनी मिळून लढण्याची वेळ असून, कोविडच्या लढ्यात यंत्रणा चांगले काम करीत असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

खा. प्रफुल्ल पटेल हे शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कोविडचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. खा. पटेल म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला. ऑक्सिजन, औषधे आणि बेडचीसुद्धा समस्या नाही. जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये पुन्हा १०० ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्यात येतील. तसेच देवरी, आमगाव, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट उभारण्यात येणार आहे, तर गोंदिया येथे पुन्हा एक ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग प्लांट उभारण्यात येणार आहे. तर स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असून, मी वेळाेवेळी प्रशासनाच्या संपर्कात असून, रोज परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहषराम कोरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, माजी जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर, नगरसेवक विनित शहारे उपस्थित होते.

........

मेडिकलमध्ये लवकरच नवीन सीटी स्कॅन मशीन

कोरोनामुळे सीटी स्कॅन करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील एकाच मशिनवरील ताण वाढला असून, येत्या १५ दिवसांत आणखी नवीन सीटी स्कॅन मशीन लावण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय मान्यता आणि निधीसुद्धा उपलब्ध आहे. मेडिकल कॉलेजच्या नवीन इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच सुरू होणार असून, २०२३ पर्यंत मेडिकलची सुसज्य इमारत तयार होईल, असा विश्वास खा. पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.

.........

अदानी प्रकल्पाकडून ५० जंबो ऑक्सिजन सिलिंडर सुपूर्द

अदानी विद्युत प्रकल्पाने कोरोना संकटात जिल्ह्याला बरीच मदत केली असून, १३ केएलच्या ऑक्सिजन टँकनंतर आता ५० जंबो ऑक्सिजन सिलिंडर सुद्धा उपलब्ध करून दिले. या ऑक्सिजन सिलिंडरचे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच आणखी ५० जंबो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले.

............

रब्बीतील धान खरेदी व नोंदणीला मुदतवाढ

खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने यंदा रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू झाली नाही, तर यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत गेली आहे. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थती लक्षात घेता रब्बी धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ देण्यात येईल. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मक दर्शविली आहे. तसेच रब्बीतील धान खरेदी सुद्धाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच धानाच्या भरडाईचासुद्धा तिढा सुटला असून, उघड्यावरील धानाची प्राधान्याने उचली केली जाणार असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले.

...........

धानाचा बोनस लवकरच

कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. सकारच्या तिजोरीतसुद्धा ठणठणाट आहे. मात्र, संकट काळात राज्य शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या बोनसची रक्कम येत्या १५ दिवसांत दिली जाईल. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीसुद्धा चर्चा केली असून, त्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखविली असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.