गर्भवतींची तपासणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:01:16+5:30

गंगाबाईतील बाह्यरूग्ण विभागातील डॉक्टर व आयुष अधिकारी यांची प्रतिनियुक्ती जिल्हा क्रीडा संकुलातील कोवीड केअर सेंटर करीता करण्यात आली आहे. अशात डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी २१ एप्रिल रोजी वैद्यकीय अधिष्ठातांना दिले. परंतु त्या पत्रावर अद्याप काहीच कार्यवाही झाली नसल्याने गर्भवतींना तपासणी न करताच घरी परत जावे लागत आहे.

No screening of pregnant women | गर्भवतींची तपासणी नाही

गर्भवतींची तपासणी नाही

ठळक मुद्देगंगाबाई रुग्णालयाचा अजब कारभार : कोरोनाच्या काळात गर्भवतींंची फरफट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील गर्भवतींची सुरक्षित प्रसूती करण्यासाठी एकमेव महिला रूग्णालय म्हणून ७५ वर्षापूर्वी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय सुरू करण्यात आले. वर्षाकाठी सात हजार ५०० गर्भवतींची प्रसूती करणाऱ्या या रूग्णालयात कोरोनाच्या काळात गर्भवतींची तपासणी करण्यासाठी एकही डॉक्टर उपलब्ध नाही. आताही या रूग्णालयात १० प्रसूती तज्ज्ञ असताना एकही प्रसूतीतज्ज्ञ बाह्यरूग्ण विभागात गर्भवतींना तपासण्यासाठी बसत नसल्याने गर्भवतींना तपासणी न करताच परत जावे लागत आहे.
गंगाबाईतील बाह्यरूग्ण विभागातील डॉक्टर व आयुष अधिकारी यांची प्रतिनियुक्ती जिल्हा क्रीडा संकुलातील कोवीड केअर सेंटर करीता करण्यात आली आहे. अशात डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी २१ एप्रिल रोजी वैद्यकीय अधिष्ठातांना दिले. परंतु त्या पत्रावर अद्याप काहीच कार्यवाही झाली नसल्याने गर्भवतींना तपासणी न करताच घरी परत जावे लागत आहे.
जिल्ह्यात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र, आठ ग्रामीण रूग्णालय, एक उपजिल्हा रूग्णालय, एक वैद्यकीय महाविद्यालय असले तरी सर्वार्धिक गर्भवतींचा भार फक्त बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयावर असतो. परंतु दिवसेंदिवस या रूग्णालयाची स्थिती सुधारण्यापेक्षा ढासळत चालली आहे. वैद्यकीय महाविद्यालय अधिनस्त चालणाºया या रूग्णालयात कोरोनाच्या काळात गर्भवतींचे हाल होत आहेत.
सोमवारी (दि.२७) सकाळी तपासणीसाठी आलेल्या गर्भवतींना तासनतास वाट बघावी लागली. त्या महिला तपासणीसाठी आल्या तेव्हा त्यांच्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवण्यात आले नाही.
महिलांना जास्त वेळ उभे राहता येत नसल्यामुळे त्यांनी जमिनीवरच आपले बस्तान मांडले. काही दिवसांपूर्वी गंगाबाईत येणाºया गर्भवतींना रेफर टू नागपूर केले जात असल्यामुळे ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित केली.
बातमी प्रकाशित होताच जिल्हा प्रशासनाने डॉक्टरांची कानउघाडणी केल्यामुळे गर्भवतींची तपासणी व प्रसूती करण्यात आली. परंतु कोरोनाच्या नावाखाली येथील डॉक्टर रूग्णांना योग्य सेवा देण्यास कुचराई करीत असल्याच्या तक्रारी सतत येत आहेत. वरिष्ठांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गर्भवतींकडे दुर्लक्ष करू नका
गोरगरीब महिला उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही. जिल्हाभरातून गर्भवती महिला तपासणीसाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात येतात. गंगाबाईत आठ प्रसूती तज्ज्ञ व चार वैद्यकीय अधिकारी असे १२ डॉक्टर उपलब्ध असताना गर्भवतींची तपासणी होत नाही. क्रीडा संकुलात येथील कोविड केअर सेंटर करीता गंगाबाईतील डॉक्टरांची निवड करण्यात आल्याने १७ एप्रिलपासून एकही डॉक्टर नसल्याचे पत्र खुद्द वैद्यकीय अधीक्षक डॉ. हुबेकर यांनी वैद्यकीय अधिष्ठातांना दिले. परंतु त्यावरही काहीच कारवाई झाली नाही. अशात आता जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

Web Title: No screening of pregnant women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.