ना फिजिकल डिस्टन्स, ना मास्क, विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांची दमछाक (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:27+5:302021-02-05T07:47:27+5:30
गोंदिया : कोरोनामुळे यंदा २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाचे ...

ना फिजिकल डिस्टन्स, ना मास्क, विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांची दमछाक (डमी)
गोंदिया : कोरोनामुळे यंदा २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाचे नियम पाळायला अडचण जात आहे. काही विद्यार्थी मास्क लावत नाहीत. मास्क, लावले तरी ते हनुवटीवर आणून ठेवतात. वारंवार त्या मास्कला हात लावून जणू कोरोनाचा विषाणू मास्कमय होऊन जातो. काहींनी मास्क लावले तर फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. जणू कोरोना हद्दपारच झाला आहे, अशा पध्दतीने विद्यार्थीवर्ग वागत आहे. वारंवार हात धुणे हे काम विद्यार्थ्यांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम बाजूला सारून शाळा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाच्या नियमात राहून विद्यार्जन करावे, यासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या मागे सतत कटकट करावी लागत आहे. लहान मुलांना शाळेत मित्रांसोबत घोळका करून राहायला आवडते. त्यामुळे ते कोरोनाचे नियम न पाळता मित्रांचे नियम पाळायला तत्पर असतात. परंतु त्यांना कोरोनाचे नियम पाळण्यासाठी विद्यार्थ्यांना वारंवार सूचना करावी लागते. तरीही विद्यार्थी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नाहीत.
एकूण शाळा- ८२९
विद्यार्थी उपस्थिती- ३५५४४
शिक्षक उपस्थिती- ३३८४
बॉक्स
कोट
१) मास्क लावल्याशिवाय विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, साबणाने हात धुवावे, फिजिकल डिस्टन्स ठेवा, अशा सूचना नेहमीच दिल्या जातात. परंतु अधामधातून विद्यार्थी एकमेकांच्या जवळ येतातच. त्यांना वारंवार या सूचनांचे स्मरण करून द्यावे लागते. मास्क लावल्याशिवाय शाळेत प्रवेश नाही, असेही आम्ही विद्यार्थ्यांना सांगितले आहे.
- यशोधरा सोनवाने, शिक्षिका
.......
२) कोरोनावर लस निघाली. पण, कोरोना अजून संपला नाही. हे आम्ही आमच्या विद्यार्थांना सांगत असतो. मास्क लावा, शारीरिक अंतर ठेवा, कोरोनाचा प्रसार होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांनी काय खबरदारी घ्यायची, यावर आम्ही माहिती देतो आणि विद्यार्थांकडे वारंवार लक्ष देतो.
-ओमप्रकाश भुते, शिक्षक,
......
३) कोरोनाचे संकट कायम असल्याने कोरोनाशी कसा लढा द्यायचा, यावर विद्यार्थांना माहिती दिली जाते. शाळेत प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थांना सूचना दिल्या जातात. ‘दो गज दुरी, मास्क है जरूरी’ या स्लोगनला सर्व विद्यार्थ्यांनी पाळले पाहिजे, असे नियमित विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतो.
- शिवकुमार पाथोडे, शिक्षक