घाेषणेनंतरही बांधकाम मजुरांना मदत नाही (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST2021-05-11T04:30:55+5:302021-05-11T04:30:55+5:30

गोंदिया : देशात काेराेना महामारीचे संकट बळावले असतानाच अनेकांना याचा फटकाही बसला आहे. यात बांधकाम कामगारही सुटलेले नाही. आवश्यक ...

No help to construction workers even after announcement (dummy) | घाेषणेनंतरही बांधकाम मजुरांना मदत नाही (डमी)

घाेषणेनंतरही बांधकाम मजुरांना मदत नाही (डमी)

गोंदिया : देशात काेराेना महामारीचे संकट बळावले असतानाच अनेकांना याचा फटकाही बसला आहे. यात बांधकाम कामगारही सुटलेले नाही. आवश्यक व मंजुरी असलेलेच बांधकाम सध्या सुरू आहेत. परंतु, अन्य क्षेत्रातील बांधकाम बंद असल्याने बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अजूनपर्यंत घाेषणेप्रमाणे या मजुरांना दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मिळाले नाही.

जिल्ह्यात ९६ हजारांपेक्षा जास्त बांधकाम मजुरांची नाेंदणी आहे, तर नाेंदणी नसलेल्या मजुरांची संख्या ४०३४ आहे. राज्य शासनाच्या घाेषणेप्रमाणे नाेंदणीकृत मजुरांना दीड हजार रुपये मिळणार असले तरी नाेंदणी नसलेल्या बांधकाम मजुरांना कुठल्याही मदतीची घाेषणा करण्यात आली नाही. हे मजूर लाभापासून वंचित राहणार आहेत. दरम्यान, हातावर कमविणे व पानावर खाणे अशी परिस्थिती असलेल्या बांधकाम मजुरांना आर्थिक मदतीची चातकासारखी प्रतीक्षा लागली आहे. शासनाने यावर त्वरित पावले उचलण्याची गरज आहे.

...........................................

काेराेनाकाळापूर्वी राेज राेजी मिळत हाेती. त्यामुळे कुटुंब चालविण्याची समस्या उद्भवत नव्हती. परंतु, संचारबंदीमुळे पुरते हतबल झाले आहाेत. आम्हा मजुरांना दीड हजार रुपयांची मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. घाेषणाही झाली आहे. मात्र, मदत अजून मिळाली नाही.

- अनिता नेवारे, बांधकाम मजूर

.....................

बांधकाम मजुरांसाठी शासनाच्यावतीने दीड हजार रुपये मदतीची घाेषणा करण्यात आली आहे. अजूनपर्यंत खात्यात रक्कम जमा झाली नाही. नाेंदणी करून दाेन वर्षांचा कालावधी लाेटला आहे. पहिल्यांदाच अशी मदत मिळणार असल्याचे माहीत झाले.

- रामेश्वर शिवणकर, बांधकाम कामगार

...............................

१५ एप्रिलपासून संचारबंदी घाेषित झाल्यामुळे तेव्हापासून हाताला काम मिळालेले नाही. मदत मिळेल याची घाेषणा हाेऊन महिना लोटला आहे. परंतु, हातात जे मजुरीचे पैसे हाेते तेही आता संपले आहे. हातउसणवारी करून संसाराचा गाडा ओढत आहे. हे किती दिवस चालणार असा प्रश्न आमच्यासमाेर निर्माण झाला आहे.

- किशोर महारवाडे, बांधकाम कामगार

..........................

राज्य शासनाने संचारबंदी केल्यानंतर दीड हजार रुपये देण्यात येईल, असे म्हटले हाेते. मात्र, अजूनपर्यंत मदत खात्यात जमा झाली नाही. परंतु, दीड हजार रुपये मिळाले तरी त्यापासून काय काय विकत घ्यावे असा प्रश्न निर्माण हाेताे. आधीच विविध समस्या आ वासून उभ्या असताना या संचारबंदीचा आम्हाला चांगलाच फटका बसला आहे.

- भुमेश्वर भांडारकर, बांधकाम कामगार

.........................................................................

नाेंदणी केलेले बांधकाम मजूर ९६०६४

नाेंदणी न केलेले बांधकाम मजूर ४०३४

Web Title: No help to construction workers even after announcement (dummy)