आत्मसमर्र्पित नक्षलवाद्यांचा नऊ गुन्ह्यांत समावेश

By Admin | Updated: December 18, 2014 22:57 IST2014-12-18T22:57:00+5:302014-12-18T22:57:00+5:30

गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर तीन जहाल नक्षलवादी आत्मसमर्पीत झाले. त्यातील एकाचा तीन गुन्ह्यात समावेश होता. तर दुसऱ्याचा चार गुन्ह्यात समावेश आहे. तिसऱ्याचा एका गुन्ह्यात समावेश

Nine incidents of self-guaranteed Naxalites are included | आत्मसमर्र्पित नक्षलवाद्यांचा नऊ गुन्ह्यांत समावेश

आत्मसमर्र्पित नक्षलवाद्यांचा नऊ गुन्ह्यांत समावेश

गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर तीन जहाल नक्षलवादी आत्मसमर्पीत झाले. त्यातील एकाचा तीन गुन्ह्यात समावेश होता. तर दुसऱ्याचा चार गुन्ह्यात समावेश आहे. तिसऱ्याचा एका गुन्ह्यात समावेश असल्याची माहिती पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर बुधवारी तीन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या जल्हेर उर्फ दलसूराम परसराम कचलाम (२१) रा. नवेझरी ता. कोरची जि. गडचिरोली याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत. तो दरेकसा, देवरी, कोरची, कुरखेडा-खोब्रामेंढा (केकेके), प्लाटून-५५ चा प्लाटून दलम सदस्य होता. त्याने सन २०१० मध्ये चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मगरडोह ते पालांदूर दरम्यान रस्त्यावर भुसुरूंग स्फोट केला होता. सन २०११ रोजी चिचगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पिपरखारी ते सुकळी रस्त्यावर रोड रोलर जाळला होता. सन २०११ मध्ये चिचगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मिसपीरी ग्राम पंचायत जाळली होती. सन २०१२ रोजी दरेकसा (जमाकुडो) येथील बीएसएनएलचे टॉवर जाळले होते.
सन२०१२ मध्ये सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोयागोंदी ग्रामपंचायत जाळली होती.सन २०१३ मध्ये नवाटोला ते मरारटोला येथे चकमकीत सहभाग होता. सन २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या खोब्रामेंढा चकमकीत सहभाग होता. सन २०११ मध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या लेकुरवाडी येथे पोलीस खबऱ्याची हत्या केली होती. सन २०१२ मध्ये छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील बरनाला येथील चकमकीत समावेश होता.
ऋषी उर्फ सुखलाल तुळशीराम परसो (२०) रा. मयालघाट ता. कोरची जि. गडचिरोली याचा चार गुन्ह्यात समावेश होता. सन २००४ मध्ये छत्तीशसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथे भूसुरूंगस्फोट घडवून आणला होता. सन २००४ मध्ये डोंगरगड येथील एका पोलीस खबऱ्याची हत्या केली होती. सन २००४ मध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या नाडेकल येथे झालेल्या चकमकीत त्याचा समावेश होता. सन २००६ मध्ये सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चांदसुरज येथील पोलीस नक्षल चकमकीत त्याचा समावेश होता.
काशीराम एैतु कोरेटी (२८) रा. तिरखुरी ता. अर्जुनी/मोरगाव जि. गोंदिया याचा गडचिरोली जिल्हञयजाच्या लेकुरबोडी येथील कारवाईत समाविष्ट असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आत्मसर्मपणासाठी शासनाने सुधारित तरतूद केली आहे. त्यानुसार दीड लाखापासून २० लाखांपर्यंतची मदत त्यांना देण्यात येत आहे. पती-पत्नी सोबत आत्मसमर्पण केल्यास १ लाख ५० हजार रूपये, गटाने हत्यारासह आत्मसमर्पण केल्यास १० लाख रूपये बक्षीस देऊन त्यांचे १०० टक्के पुनर्वसन, मागणी केल्यास कौशल्य प्रशिक्षण, सवयंरोजगारासाठी १०० टक्के अनुदानाने व्यवसायानुसार आर्थिक मदत, घर अथवा घरासाठी भूखंड व घरबांधणीसाठी आर्थिक सहाय्य, आत्मसर्मपीत नक्षलवाद्यांच्या मुला-मुलींना पहिली ते बारावीचे पर्यंतच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ, केंद्र व राज्य सरकारच्या कार्यान्वीत योजनांतर्गत आत्मसमर्पीतांना सर्व प्रकारची मदत, त्यांना ओळखीसाठी आधार कार्ड, बँक खाते, रेशन कार्ड, मतदान कार्ड, गॅस कनेक्शन देण्यात येते. नक्षल चळवळीत ज्या नक्षलवाद्यांची सक्तीची नसबंदी केली असल्यास त्यांची इच्छा असल्यास त्या नसबंदीची रिओपनिंग केली जाते, अशी माहिती पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nine incidents of self-guaranteed Naxalites are included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.