सरपंच संघटनेतर्फे नवनिर्वाचित सरपंच व पत्रकारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:55 IST2021-03-04T04:55:35+5:302021-03-04T04:55:35+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितेश खोब्रागडे होते. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. प्रकाश गंगापारी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमाईवार, पत्रकार ...

Newly elected Sarpanch and journalists felicitated by Sarpanch Association | सरपंच संघटनेतर्फे नवनिर्वाचित सरपंच व पत्रकारांचा सत्कार

सरपंच संघटनेतर्फे नवनिर्वाचित सरपंच व पत्रकारांचा सत्कार

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितेश खोब्रागडे होते. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. प्रकाश गंगापारी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमाईवार, पत्रकार रमाकांत खोब्रागडे, सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष राजेश पेशने, सरचिटणीस राजेंद्र चामट, युनियनचे सचिव किरण पारधी उपस्थित होते. याप्रसंगी येथे नुकत्याच निवडलेल्या सरपंच व पत्रकारांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व पाहुण्यांनी आपले विचार मांडले. यावेळी मार्गदर्शन करताना नितेश खोब्रागडे यांनी पत्रकारांच्या मदतीने हक्क आणि ग्रामपंचायतीच्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी लढू शकतात, असे सांगितले. नुकत्याच झालेल्या उपोषणाबाबत पत्रकारांनी केलेल्या पाठपुराव्याचे सरपंच किरण पारधी यांनी कौतुक केले. हुपराज जमाईवार यांनी सर्व सरपंचांना त्यांच्या हक्काबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सरपंच राजेंद्र चामट यांनी केले. सरपंच नरेश आशाटी यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार लक्ष्मीनारायण दुबे, अतित डोंगरे, स्वप्नील शहरे, देवानंद शहारे, अजय नंदगवळी, हितेंद्र जांभूळकर, रमाकांत खोब्रागडे, रेखलाल रहांगडाले उपस्थित होते.

Web Title: Newly elected Sarpanch and journalists felicitated by Sarpanch Association