६६ अंगणवाड्यांना नवीन इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:22+5:30

जिल्ह्यात शेकडो अंगणवाड्यांच्या इमारती जिर्ण आहेत. त्याकधी कोसळतील याचा नेम नसल्याने अंगणवाड्यांसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा होत आहे. सन २०१९-२० या वर्षात ६६ आंगणवाड्या मंजूर करण्यात आल्यात. तत्कालीन उपमुख्य कार्यपालन अधिकारी महिला बाल कल्याण यांनी आपल्या मनमर्जीनुसार त्या ६६ अंगणवाड्यांची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी सादर केली होती.

New building for 66 Anganwadi | ६६ अंगणवाड्यांना नवीन इमारत

६६ अंगणवाड्यांना नवीन इमारत

ठळक मुद्देशेकडो जीर्ण अंगणवाड्या : प्रत्येक अंगणवाडीला १०.९० लाख

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात २५ ते ३० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या अंगणवाड्यांची हालत खस्ता आहे. त्या अंगणवाड्या कधी पडतील याचा नेम नसल्याने त्या इमारतीत चिमुकल्यांना बसविले जात नाही. त्यांना ग्रामपंचायत इमारत किंवा उघड्यावर बसविले जाते. अंगणवाड्याना हक्काची इमारत हवी म्हणून मानव विकास योजनेतून जिल्ह्यात ६६ अंगणवाड्यांसाठी नवीन इमारत तयार करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात शेकडो अंगणवाड्यांच्या इमारती जिर्ण आहेत. त्याकधी कोसळतील याचा नेम नसल्याने अंगणवाड्यांसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा होत आहे. सन २०१९-२० या वर्षात ६६ आंगणवाड्या मंजूर करण्यात आल्यात. तत्कालीन उपमुख्य कार्यपालन अधिकारी महिला बाल कल्याण यांनी आपल्या मनमर्जीनुसार त्या ६६ अंगणवाड्यांची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी सादर केली होती. परंतु यावर वेळीच स्थायी समितीचे सदस्य तथा जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनी आक्षेप घेतला होता. तत्कालीन उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी कसलाही रेकॉर्ड न बघता किंवा कनिष्ठ कार्यालयाकडून माहिती न घेता सरसकट आपल्या मर्जीने या अंगणवाड्यांची यादी तयार केली होती. त्यामुळे जिर्णावस्थेत असलेल्या अंगणवाड्यांना नवीन इमारत न बांधता अन्यत्र इमारत बांधकाम करण्याची यादी तयार केली होती.
त्यावर हर्षे यांनी तक्रार केली होती. तत्कालीन उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांनी महिला बाल कल्याण समिती, स्थायी समिती सर्वसाधारण समिती किंवा जि.प. अध्यक्ष यांच्याही निदर्शनास न आणून देता त्या अंगणवाड्यांची यादी तयार केली होती.
परिणामी हर्षे यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यांच्या या मागणीवर लक्ष घालून महिला बाल कल्याण समितीच्या विश्वासाने आता नव्याने गरजेच्या ठिकाणी अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे ठरविले आहे.

सहा कोटी ८३ लाखांचा निधी
मंजूर झालेल्या ६६ अंगणवाडींच्या इमारत बांधकामासाठी नऊ लाख ४० हजार तर त्या अंगणवाडीतील चिमुकल्यांसोबत कुठली घटना होऊ नये यासाठी आवारभिंत तयार केली जाणार आहे. या आवारभिंतीसाठी दिड लाख रूपये असे १० लाख ९० हजार रूपये अंगणवाडीवर खर्च होणार आहे. एकूण ६६ अंगणवाड्यांसाठी सहा कोटी ८३ लाख ४० हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
जीर्ण अंगणवाड्यांकडे लक्ष केंद्रित करा
जिल्ह्यात २५ ते ३० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या अंगणवाड्या जिर्णावस्थेत आहेत. या अंगणवाड्यांची संख्या शेकडोच्या घरात आहेत. त्यांचा जिर्णोद्धार करून चिमुकल्या बालकांना सुरक्षा देण्यासाठी नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात यावे असा पालकांचा सूर आहे.

महिला बाल कल्याण समितीमध्ये ठराव घेण्यात आला आहे. गरज आहे त्या ठिकाणी या अंगणवाड्या देण्यात येतील असे ठरले आहे. निकषानुसार पात्र असलेल्या ठिकाणी अंगणवाड्यांच्या इमारती तयार करण्यात येणार आहेत.
-सुरेश हर्षे
जि.प.सदस्य तथा स्थायी समिती सदस्य जि.प. गोंदिया.

Web Title: New building for 66 Anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.