ग्राहकांना ‘घरपोच सेवा’ देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:00:39+5:30
देशात कोरोना आपले हातपाय झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव बघता याला वेळीच आवर घालता यावी, यासाठी अवघ्या देशात २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला असून प्रसंगी बघता त्यात आता वाढही करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लोकांना घरात राहण्यास सांगीतले असून महत्त्वाचे काम असल्यास बाहेर निघण्याची मुभा आहे.

ग्राहकांना ‘घरपोच सेवा’ देण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाकडून विविध प्रयोग व नियम लागू केले जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंची पुर्तता करता यावी यासाठी ‘होम डिलिव्हरी’ची सुविधा दिली जात आहे. मात्र बँकांमध्ये नागरिकांची गर्दी होत असून कळत नकळत ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा होताना दिसत आहे. हा प्रकार धोक्याची घंटा असून यावर वेळीच आवर घालण्यासाठी बँकांनी ग्राहकांना ‘घरपोच’ सेवा देण्याची गरज दिसून येत असून तशी मागणी काही सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.
देशात कोरोना आपले हातपाय झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव बघता याला वेळीच आवर घालता यावी, यासाठी अवघ्या देशात २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला असून प्रसंगी बघता त्यात आता वाढही करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लोकांना घरात राहण्यास सांगीतले असून महत्त्वाचे काम असल्यास बाहेर निघण्याची मुभा आहे. नागरिकांची गरज लक्षात घेता औषध, भाज्या व जीवनावश्यक वस्तूंची पुर्तता करण्यासाठी ‘होम डिलिव्हरी’ची सुविधा व्यापाऱ्यांनी सुरू केली आहे. जेणेकरून नागरिकांनी घराबाहेर पडू नये हा यामागील उद्देश आहे.
याचा लाभही नागरिक घेत असून घराबाहेर न पडता शासन नियमांचे पालन करीत आहे. असे असताना मात्र बँकांना ‘लॉकडाऊन’पासून वगळण्यात आले असून बँकांचे कामकाज सुरूच आहे. आता बँका सुरू असल्याने नागरिकही आपली कामे घेऊन जात आहेत. परिणामी बँकांमध्ये नागरिकांची चांगलीच गर्दी बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, बँकांकडून ग्राहकांसाठी बाहेर मंडप घालून तसेच काही अंतर ठेवून खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कळत नकळत बँकांमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा होत असताना दिसून येतच आहे. हा प्रकार धोक्याची घंटा असून यावर आळा घालण्याची गरज आहे. यासाठी बँकांनी ग्राहकांना ‘घरपोच सेवा’ देण्याची गरज असून तशी मागणीही केली जात आहे.
ग्राहक व कर्मचारीही सुरक्षित
बँकांनी आपला एक हेल्पलाईन नंबर दिला पाहिजे.जेणेकरून ग्राहकाला काही काम असल्यास त्यावर कॉल करून सांगावे. त्यानंतर बँक ेने कार्यालयातूनच त्यांचे काम आटोपून द्यावे. गरज असल्यास ग्राहकाला बँकेत बोलावून घ्यावे. याशिवाय ग्राहकाशी संपर्क साधता येत असल्यास त्याला घरी जाऊन सेवा देता येईल. असे केल्यास बँकेतील गर्दीपासून निर्माण होणाºया धोक्यापासून ग्राहक व बँक कर्मचारी सुद्धा सुरक्षित राहतील. सध्या स्थितीत बहुतांश नागरिकांकडे एटीएम असल्यामुळे त्यांना पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागत नाही. मात्र अन्य कामांसाठी बँक ग्राहकांना एवढी सुविधा नक्कीच देऊ शकतात.
जिल्हावासी झाले बिनधास्त
जिल्ह्यात कोरोनाचा एकच रूग्ण आढळला होता व तोही आता कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा कोरोनामुक्त आहे. परिणामी शासनाकडून जिल्ह्याला काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र जिल्हावासी याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. आपल्या जिल्ह्याला व आपल्याला आता काहीच होणार असा आव आणून ते बिनधास्त फिरत आहेत. मात्र काळजी घेणे गरजेचे असल्याने आता पोलिसांनीही कठोर कारवाई करण्याची गरज आहे.