विकासकामांना प्राधान्य देण्यापूर्वी पर्यावरणाच्या रक्षणाची गरज
By Admin | Updated: July 18, 2014 00:09 IST2014-07-18T00:09:36+5:302014-07-18T00:09:36+5:30
तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील जनतेला मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून खुश करण्याच्या प्रयत्नात नैसर्गिक वातावरणाला दुषित करून जागोजागी सिमेंट क्रांकीटची जंगले

विकासकामांना प्राधान्य देण्यापूर्वी पर्यावरणाच्या रक्षणाची गरज
रावणवाडी : तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील जनतेला मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून खुश करण्याच्या प्रयत्नात नैसर्गिक वातावरणाला दुषित करून जागोजागी सिमेंट क्रांकीटची जंगले निर्माण करण्यात येत आहेत. याचाच परिणाम आज भूपृष्ठावर अधिवास करणाऱ्या जीवांवर होत असून भविष्यात भूपृष्ठावरील स्थिती भेसूर होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.
वातावरणामध्ये सतत झपाट्याने बदल होत असून पशु, पक्षी, प्राणी, मनुष्य, वनस्पती आदी सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पृथ्वीचे संरक्षण होणे गरजेचे असून मानवाने केलेली आधुनिक क्रांती व प्रगतीच पृथ्वीच्या विनाशासाठी कारणीभूत ठरेल, असे भाकित संशोधक, पर्यावरणवादी लेखक व निसर्ग मित्रांनी केले आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे काळाजी गरज ठरली आहे. मात्र या बाबीकडे स्थानिक प्रशासन व लोक प्रतिनिधी या प्रकारावर लक्ष पुरवित नसल्यामुळे दिवसेंदिवस या भागातील परिस्थिती आटोक्याबाहेर होत चालली आहे.
२१ व्या शतकात मानवाने पृथ्वीतलावर अनेक मोठमोठे शोध लावलेत व संशोधन केले. हे यूग विज्ञान युग म्हणून ओळखले जाते. तसेच २१ वे शतक संगणक युग म्हणून सर्वांना माहीत आहे. परंतु मानवाने प्रगतीची दालने मोकळी करताना निसर्गाला कुणीही जिंकू शकत नाही, असे म्हटले जाते.
मनुष्याने चंद्रावर स्वारी केली, यशाची अनेक शिखरे पदाक्रांत केली. पण तो निसर्गाला जिंकू शकत नाही. त्यामुळे निसर्ग मानवाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. मुनष्याने धरणे, कालवे, तलाव, रस्ते इमारती बांधण्यासाठी आणि इतर कार्यासाठी वृक्षांची बेसुमार कत्तल करीत आहेत. शेकडो वर्षापासून करण्यात येत असलेले संवर्धन क्षणार्धात कापून टाकले. त्यामुळे अनेक वृक्षांच्या जाती दूर्मिळ होऊन बऱ्याच जाती लुप्त होऊन उरलेल्या जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हेच वृक्ष पशु-पक्ष्यांना खाद्य, निवारा पुरवायचे, जीवनाला आवश्यक प्राणवायू द्यायचे. मात्र वृक्ष तोडीमुळे परिसरातील जंगल, शेतशिवार ओसाड होण्याच्या मार्गावर आहेत.
विभागाच्याच लोक सेवकांकडूनच वृक्ष तोडीला प्रोत्साहन लाभत असल्याने सर्रास निर्भिडपणे वृक्ष तोड होत आहे. याचेच परिणाम नागरिकांना सहन करणे भाग पडत आहे. पर्यावरण प्रदुर्षित झाले त्यामुळे जिव-जंतूंवर होणारे परिणाम बघूनही उपाय योजना करणे सोडून पर्यावरण दुषित होण्यास मदत मिळेल.
वृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने जंगलातील वन्यप्राणी गावांकडे भटकत आहेत. त्यामुळेच प्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे. यामुळे पर्यावणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)