शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ ग्राम योजनेचे चिंतन करणे आवश्यक

By admin | Updated: December 7, 2014 22:54 IST

जिल्हा परिषदने या देशाचे पंतप्रधान यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याकरिता जि.प. स्वच्छ ग्राम योजनेची तावातावात घोषणा करून याची सुरूवात देवरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातून केली.

देवरी : जिल्हा परिषदने या देशाचे पंतप्रधान यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याकरिता जि.प. स्वच्छ ग्राम योजनेची तावातावात घोषणा करून याची सुरूवात देवरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातून केली. यासाठी देवरीच्या छत्रपती शिवाजी लॉनमध्ये मेळावाही पार पडला. या मेळाव्यानंतर देवरी गावातील सहा वॉर्डात सहा पथकांच्या माध्यमातून सुमारे ६०० अधिकारी-पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात स्वच्छता केल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. यावर खर्चही करण्यात आले. परंतू या मेळाव्याच्या आयोजनातून साध्य काय झाले? याचे चिंतन करणे आवश्यक आहे.
सविस्तर असे की, या स्वच्छ ग्राम योजनेच्या माध्यमातून देवरी गावात फिरून फोटो काढण्यापलीकडे या अभियानातून काहीही साध्य झाले नाही. यात स्थानिक ग्रा.पं. चे पदाधिकारी तर आपसी कलहामुळे फारसे उत्साहित नसल्याचे दिसले. शिवाय देवरी येथे राजीव गांधी गतीमानता अभियानांतर्गत ५२ जि.प. सदस्यांचे यशदामार्फत प्रशिक्षण सुरू होते. मात्र बोटावर मोजण्याइतक्या पाच-दहा सदस्यांनी या मेळाव्यात लावलेली हजेरी, या अभियानाच्या यशस्वितेबद्दल बरेच काही सांगून गेली. देवरी शहरात जेथे घाणीचे साम्राज्य आहे, तेथे तर ग्रामपंचायत कधी ढुंकून पाहत नाही. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही लक्ष दिले नाही. केवळ स्वच्छ असलेल्या रस्त्यांवरच फिरून फोटोसेशन करण्यापुरते सदर कार्यक्रम झाले.
दुसऱ्या दिवशी लोकांनी शासकीय कार्यालयांंना भेट दिल्यावर कार्यक्रमात आघाडीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांचेच शासकीय कार्यालय व परिसर घाणीने माखलेले दिसले. यावरून जनतेत जो संदेश जायचा तो गेलाच.
निर्मल ग्राम योजनेत या जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतींपैकी सुमारे ३२७ ग्रामपंचायत निर्मल झाल्याचा रेकार्ड जि.प. कडे आहे. आता स्वच्छ ग्राम योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रत्येक जि.प. सदस्याला एक गाव दत्तक घ्यायचे आहे. ही योजना जाहीर होताच काही चलाख जि.प. सदस्यांनी मनोमन गावांची निवडसुध्दा करून टाकली. यात राज्यस्तरापासून तर तालुकास्तरावर पुरस्कार प्राप्त गावांचादेखील समावेश आहे. यामुळे या सुंदर योजनेचे वाटोळे करण्याचे आधीच शिजले, अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. असे झाले तर मागील सरकारवर दोषारोप करीत आम्हीच या गावांचा कायापालट केला, अशी फुशारकी मारली जाण्याची शंका आहे. त्यामुळे जि.प. अध्यक्षांनी या बाबींकडे लक्ष देऊन अतिमागास व जी गावे अद्यापही स्वच्छतेच्या बाबतीत समोर आलीच नाही, अशा गावांना सदस्यांनी प्राधान्य द्यावे, असे सूचविणे आवश्यक आहे.
देवरी येथील स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करताना जनतेचा किंवा ज्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांचा प्रत्यक्ष सहभाग घेणे आवश्यक होते. कारण त्यांचा थेट संबंध स्वच्छतेशी येतो. एका ठिकाणी मेळावा आयोजित करून आणि त्या मेळाव्यात केवळ अधिकारी आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्याचे धोरण राहिले तर स्वच्छता वियषक चळवळींना यश येणे शक्य नाही. फक्त आदेश म्हणून हजर रहायचे आणि शासकीय पैशांची केवळ उधळपट्टी याशिवाय फारसे काही साध्य होऊ शकत नाही. यासाठी जनतेचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. शिवाय ज्या अधिकाऱ्यांचा या मेळाव्यात सहभाग होता किमान त्यांचे कार्यालय किंवा परिसर तरी स्वच्छ आहेत की नाही, हे तपासण्याची तसदी कोणी घेतल्याचे ऐकिवात नाही. यासाठी प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहे.