राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

By Admin | Updated: February 13, 2016 01:09 IST2016-02-13T01:09:16+5:302016-02-13T01:09:16+5:30

तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे रतनारा, धापेवाडा व एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

NCP's review meeting | राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

गोंदिया : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे रतनारा, धापेवाडा व एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यात आ. राजेंद्र जैन व माजी आ. दिलीप बंसोड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आ. जैन यांनी नवीन लोकांना जोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रीयतेने कार्य करण्याचे आवाहन केले.
पक्ष कार्यकर्ते पक्षाच्या नावाने ओळखले जातात. पक्षासाठी सक्रीयतेने कार्य केल्याने पक्ष वाढते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा मनोबलही वाढते. आपसी वाद विसरून पक्ष वाढविणे व पुढील निवडणुकींसाठी सक्रीयतेने कार्य करताना प्रत्येक बुथसाठी नवीन कमिटी गठित करण्यास त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रामुख्याने महिला जिल्हा अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, तालुका अध्यक्ष बाळकृष्ण पटले, घनश्याम मस्करे, मदनलाल चिखलोंढे, कृष्णकुमार जायस्वाल, रवी बंटी पटले, राजू कटरे, लेखराम ठाकरे, प्रदीप रोकडे, राखी ठाकरे, रिना बघेले, महेंद्र बघेले, माया सोयाम, हौसलाल रहांगडाले, मोहन पटले, दुलिचंद चौरीवार, बळीराम बरोने, तेजलाल डहाके, विजय उपवंशी, गेसकुमार उपवंशी, सुरेंद्र बसेने, बिहारीलाल बसेने, नारायण मोहारे, जियालाल लिल्हारे, मेघलाल चिखलोंढे, बेनीराम ढेकवार, दुर्योधन भोयर, देवचंद दमाहे, अनिल नावणे, नोकलाल धामळे, इंकेश्वरी बसेने, कल्पना बोरकर, सुनीता बोरकर, नेहरूलाल धुर्वे, पूरणलाल लिल्हारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.