जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:32 IST2021-09-05T04:32:51+5:302021-09-05T04:32:51+5:30

आमगाव : खा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम करावयाचे आहे. पक्ष ...

The NCP is committed to solving the problems of the masses | जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध

जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध

आमगाव : खा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम करावयाचे आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बुथ कमिटींचे सशक्तीकरण करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष असून सामान्य जनता, महिला, बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष प्रामाणिक प्रयत्न करीत असून नेहमी अग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बनगाव येथील सरस्वती विद्यालयात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षबांधणी, पक्ष विस्तार व बूथ कमिटी तयार करणे यावर चर्चा केली. बैठकीला नरेश माहेश्वरी, देवेंद्रनाथ चौबे, टीकाराम मेंढे, कमलबापू बहेकार, अंजली बिसेन, सुरेश हर्षे, राजेश भक्तवर्ती, जियालाल पंधरे, देवेंद्र माछिरके, मुक्तानंद पटले, चुन्नीलाल सहारे, पीयूष झा, संतोष श्रीखंडे, सुभाष यावलकर, जयश्री पुंडकर, उषा हर्षे, संगीता दोनोडे, प्रमिला चकोले, शीला हजारे, रूपाली भक्तवर्ती, अनुकला मडावी, सीमा शेंडे, संगीता ब्राह्मणकार, लक्ष्मी येडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The NCP is committed to solving the problems of the masses