शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नक्षलवाद्यांनी गोंदिया जिल्ह्यात जाळला लाकूड डेपो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:47 PM

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथील वन विभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी शुक्रवारी (दि.२५) रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास आग लावल्याने यात चार लाखांचा लाकूड जळून खाक झाला. ही घटना शनिवारी (दि.२६) दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देचार लाखांचे नुकसान नक्षली कारवायांमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथील वन विभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी शुक्रवारी (दि.२५) रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास आग लावल्याने यात चार लाखांचा लाकूड जळून खाक झाला. ही घटना शनिवारी (दि.२६) दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.राजोलीपासून ३ किमी अंतरावर वन विभागाच्या वनपरिक्षेत्र क्रमांक ३३० मध्ये लाकूड डेपो आहे. या डेपोमध्ये अंदाजे ३० घनमीटर इमारत बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ६८ घनमीटर लाकडाचा साठा होता. हा सर्व लाकूड नक्षलवाद्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जाळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नक्षल्यांनी लावलेल्या आगीमध्ये या डेपोमधील संपूर्ण लाकूड जळाल्याने वनविभागाचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी दुपारच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी डेपो परिसरात गेले असता हा प्रकार त्यांच्या उघडकीस आला. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केशोरी पोलीस स्टेशनला दिली. शुक्रवारी (दि.२५) राजोली भरनोली परिसरात नक्षली पत्रके व बॅनर आढळले होते. या पत्रकाच्या माध्यमातून नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर एकाच दिवसानंतर लाकूड डेपोला आग लावल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गडचिरोली पोलिसांनी ३६ नक्षल्यांचा खात्मा केल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांचा मोर्चा गोंदिया जिल्ह्याकडे वळविला आहे. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील नक्षली कारवायांमध्ये वाढ झाली आहे.

डेपो जाळणाऱ्या १५ नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखलकेशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजोलीजवळील सायगाव येथील वनविभागाच्या डेपोला आग लावून ४ लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले. शनिवारच्या पहाटे १५ नक्षलवाद्यांनी या डेपोला आग लावली. यासंदर्भात केशोरी पोलिसांनी नक्षलवाद्यांवर भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ४३५, सहकलम १६, २०, २३ बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा कलम १३५, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीfireआग