राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मेळावा थाटात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:12+5:302021-01-24T04:13:12+5:30
उद्घाटन माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन यांच्या हस्ते आणि तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पारबता चांदेवार यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. ...

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मेळावा थाटात ()
उद्घाटन माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन यांच्या हस्ते आणि तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पारबता चांदेवार यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सदस्य अर्चना ताराम, महिला शहर अध्यक्ष शर्मिला टेंभुर्णीकर, मंजूषा वासनिक, आदिवासी आघाडीच्या महिला तालुकाध्यक्ष प्रमिला गावळकर, महिला सक्रिय कार्यकर्ता उषा तिवारी, कोमल अग्रवाल, रूपाली गोडसेलवार, प्रियंका सलामे, ममता गिरी, किरण चनाप, शीतल आंबीलकर, टेंभरे, संगीता शाहू, कोमल खरोले, अंजली शेंडे, पुष्पा मस्के, मीना कुंभरे, पुष्पा रहांगडाले, सुधा ताराम, प्रमिला देशपांडे, अनुकला कोडापे, रीता शिवणकर, रीता ताराम, नलिनी बहेकार, गंगासागर मानकर, प्रियंका फुंडे, इंदिरा लांडेकर यांच्यासह शहर व तालुक्यातील महिला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिलांना सुमन बिसेन, अर्चना ताराम, मंजूषा वासनिक, शर्मिला टेंभुर्णीकर व पारबता चांदेवार यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, उपस्थित महिलांना वाण वाटप करण्यात आले. सोबतच महिलांसाठी संगीतखुर्ची व १ मिनिटात उखाणे म्हणणे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्चना ताराम यांनी केले. आभार आरती जांगळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी चिचगडच्या आरती जांगळे व माधुरी शहारे यांच्यासह तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.