राष्ट्रीय छात्रसेनेचे पाच दिवसीय शिबिर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:02+5:302021-03-06T04:28:02+5:30

शिबिरात एकूण १५६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्त आणि कडक नियमांचे पालन करून विविध प्रशिक्षण प्राप्त ...

National Student Army Five Day Camp () | राष्ट्रीय छात्रसेनेचे पाच दिवसीय शिबिर ()

राष्ट्रीय छात्रसेनेचे पाच दिवसीय शिबिर ()

शिबिरात एकूण १५६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्त आणि कडक नियमांचे पालन करून विविध प्रशिक्षण प्राप्त केले. प्रशिक्षणाला सकाळी ६.३० वाजतापासून सुरुवात होत होती. सर्वप्रथम पीटी, ड्रील आणि ३ किमी धावणे, या शारीरिक व्यायामाबरोबरच शस्त्र प्रशिक्षण, नकाशा प्रशिक्षण, रायफल प्रशिक्षण, परिस्थिती आणि वातावरणाशी समरस होण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासोबतच युद्ध कला कौशल्य, नैतृत्व, आपदा प्रबंधन, व्यक्ती महत्त्व विकास या सामान्य विषयाचे अध्ययन आणि प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासोबतच युद्ध कला कौशल्य, नेतृत्व, आपत्ती व्यवस्थापन, व्यक्तीसह विकास या सामान्य विषयाचे अध्ययन आणि प्रशिक्षण देण्यात आले. २०२०-२०२१ चे वर्ष जागतिक महामारी, कोरोनाचे वर्ष असल्यामुळे या संकट काळात महाविद्यालय तिरोडाचे प्राचार्य डॉ. मृत्यूंजय सिंह यांनी यासाठी महाविद्यालयाचे क्रीडांगण आणि परिसर उपलब्ध करून दिला. शिबिरासाठी महाराष्ट्र बटालियन, एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर, कर्नल अमित चौधरी, प्रशासकीय अधिकारी कर्नल रंजीत, अजय बी.वाखले, नरेश असाटी, डॉ.एच.पी.पारधी, चव्हाण, डॉ. एम. व्ही. सिंह, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: National Student Army Five Day Camp ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.