बोअरवेलमधील पाण्यात आढळला नारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 05:00 AM2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:16+5:30

गडेवारटोला येथील ताराचंद भेलावे यांच्या घराजवळील बोअरवेलमधून सलग १५ दिवसानंतर गावकऱ्यांनी पाण्याचा वापर करण्यास सुरूवात केली. सोमवारी पुन्हा या बोअरवेलमधून ९ ते १० इंचाचा नारू निघाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच या बोअरवेलमधून नारू निघाला होता. याची माहिती गावकऱ्यांनी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाला दिली होती. मात्र यानंतरही ग्रामपंचायतने कुठलीच उपाय योजना केली नाही.

Naru found in water in Borewell | बोअरवेलमधील पाण्यात आढळला नारू

बोअरवेलमधील पाण्यात आढळला नारू

googlenewsNext
ठळक मुद्देगडेवारटोला येथील घटना : गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : देवरी तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतंर्गत येणाºया गडेवारटोला येथील बोअरवेलच्या पाण्यात नारू निघाल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वीच घडली होती.त्यानंतर सोेमवारी (दि.३०) पुन्हा बोअरवेलमधील पाण्यातून नारू निघाल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
गडेवारटोला येथील ताराचंद भेलावे यांच्या घराजवळील बोअरवेलमधून सलग १५ दिवसानंतर गावकऱ्यांनी पाण्याचा वापर करण्यास सुरूवात केली. सोमवारी पुन्हा या बोअरवेलमधून ९ ते १० इंचाचा नारू निघाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच या बोअरवेलमधून नारू निघाला होता. याची माहिती गावकऱ्यांनी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाला दिली होती. मात्र यानंतरही ग्रामपंचायतने कुठलीच उपाय योजना केली नाही. परिणामी नागरिकांना दूषीत पाणी पिण्याची वेळ आली असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दर महिन्याला आरोग्य विभागाकडून गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे आरोग्य विभागाकडून परीक्षण केले जाते. मात्र यानंतरही दूषीत पाण्याची आणि नारु निघण्याची समस्या कायम आहे.त्यामुळे या परीक्षणावर सुध्दा प्रश्च चिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान सोमवारी पुन्हा बोअरवेलमधून नारु निघाल्यानंतर गावकºयांनी गढूळ पाणी व नारु ग्रामपंचायकडे सपूर्द केले. ग्रामसेवक बनकर यांनी या पाण्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत पाठविले. गडेवारटोला येथील गावकºयांनी दूषीत पाण्याची समस्या वांरवार सरपंचांना सांगून त्यांनी अद्यापही यावर कुठलीच उपाय योजना केली नाही. परिणामी गावकºयांचे आरोग्य धोक्यत आले आहे. या प्रकारामुळे गावकºयांमध्ये नाराजीचा सुरू आहे. याकडे ग्रामपंचायत सदस्यांचे सुध्दा दुर्लक्ष झाल्याचा आरोप आत्माराम मेश्राम, बब्बुप्रसाद उपाध्याय, राजकुमार कोरोटे, कैलाश पटले, विलास मेश्राम, कैलास खडिसंगे व गावकºयांनी केला आहे.

Web Title: Naru found in water in Borewell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.