नगर पंचायतच्या तीन पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

By Admin | Updated: April 17, 2017 01:00 IST2017-04-17T01:00:27+5:302017-04-17T01:00:27+5:30

१३ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेत न आलेल्या विषयांची नियमबाह्यपणे नोंद प्रोसेडिंगमध्ये घेतल्याने

Nagar Panchayat's three office bearers hanging in disqualification | नगर पंचायतच्या तीन पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

नगर पंचायतच्या तीन पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

१६ सदस्य आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार
देवरी : १३ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेत न आलेल्या विषयांची नियमबाह्यपणे नोंद प्रोसेडिंगमध्ये घेतल्याने नगर पंचायतच्या १६ नगरसेवकांनी ३ पदाधिकाऱ्यांविरूध्द जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी (दि.१२) तक्रार केली. आता जिल्हाधिकारी या तीन पदाधिकाऱ्यांना अपात्र करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सध्या नगरपंचायतचे राजकारण पालटण्याचे चित्र दिसून येत आहे.
सविस्तर असे की, नगर पंचायतची सर्वसाधारण सभा ५ एप्रिल रोजी सिरपूर येथील विश्रामगृहात घेण्यात आली होती. या सभेच्या एक दिवसाअगोदर म्हणजे ४ एप्रिल रोजी मागील सर्व साधारण सभेचे १३ फेब्रुवारीचे कार्यवृत्त नगरसेवकांना देण्यात आले होते. वेळेवर मिळालेल्या कार्यवृत्ताचे वाचन केल्यावर नगरसेवकांच्या निदर्शनास आले की सभाध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर कोणतेच विषय आलेले नव्हते. सभेच्या विषय सुचीमध्ये क्र.१ ते १६ पर्यंत विषय होते. फक्त त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले होते.
चर्चेत ना आलेल्या विषयांची नियमबाह्य नोंद सभेच्या प्रोसेडींगमध्ये घेवून व नगरसेवकांना अंधारात देवून प्रस्ताव क्रं.१७ ते १९ मंजूर झाल्याचे दर्शविले आहे. ही बाब अत्यंत गंभीर व गैरकायदेशीर असून नियमबाह्य नोंद करणाऱ्या तीन पदाधिकाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र १६ नगरसेवकांनी १२ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. १९ सदस्य संख्या असणाऱ्या देवरी नगर पंचायतच्या १६ नगरसेवकांनी ३ मोठ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाहीची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली असून हे तीन नगरसेवक स्वत:ला वाचविण्याकरीता धडपड करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, नियमबाह्य घेण्यात आलेले ठराव क्रं.१७ ते १९ यामध्ये सूचक अनुमोदक व ठराव पारीत करणाऱ्या अध्यक्षांवर नगर पंचायत अधिनियम ५५ अ अंतर्गत अपात्रतेची कारवाही निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये नगराध्यक्ष सुमन बिसेन, उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके व बांधकाम सभापती आफताब शेख यांचेवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्य नेमीचंद आंबीलकर, रितेश अग्रवाल, दवीदरकौर भाटीया, माया निर्वाण, हेमलता कुंभरे, महेश जैन, सतोष तिवारी, कौसल्या कुंभरे, संजय उईके, कांता भेलावे, भुमिता बागडे, कोकीळा दखने, यादव पंचमवार, प्रवीण दहीकर, अनिल अग्रवाल व सीता रंगारी यांनी लेखी तक्रार केली असून लवकरच या तीन पदाधिकाऱ्यांना नोटीस मिळणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
उल्लेखनीय असे की, १८ महिन्यांचा कार्यकाळ या नगरसेवकांचा झाला असून आता जर या तीन सदस्यांवर अपात्रतेची पाळी आली तर या तिन्ही जागांवर पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Nagar Panchayat's three office bearers hanging in disqualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.