क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:33 IST2021-09-14T04:33:55+5:302021-09-14T04:33:55+5:30

गोरेगाव : क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाने उग्र रूप धारण केल्याने युवकाच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना ...

Murder of a youth for trivial reasons | क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून

क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून

गोरेगाव : क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाने उग्र रूप धारण केल्याने युवकाच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना रविवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील हेटी पालेवाडा येथे घडली. वैभव सुनील करंडे (वय २३ वर्षे, रा. हेटी पालेवाडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील हेटी पालेवाडा येथे दोन दिवसांपूर्वी केळीचे झाड रस्त्यावरून हटविण्याच्या वादातून भांडण झाले होते. या घटनेत वैभव सुनील करंडे यांनी गोरेगाव पोलिसांत दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. १२ सप्टेंबर रोजी वैभव आरोपीच्या घरी त्याला मारण्याच्या उद्देशाने गेल्यावर आरोपी ओमकार मेश्राम याने कुऱ्हाडीने वैभवच्या गळ्यावर वार केले. यात वैभवचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी सुनील करंडे (रा. हेटी पालेवाडा) यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपी ओमकार मेश्राम याला जेरबंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन मैत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इन्साराम देवारी हे करीत आहेत.

Web Title: Murder of a youth for trivial reasons