जुन्या वादातून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST2020-03-12T06:00:00+5:302020-03-12T06:00:04+5:30

मागील चार महिन्यापूर्वी मृतक निलेश याने दारु पिऊन आरोपी पन्नालाल लिल्हारे याच्या सोबत वाद केला होता.त्या वादाचा वचपा म्हणून १० मार्चच्या रात्री ९ वाजता त्याचा खून करण्यात आला. निलेश मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजता सायकलने कावराबांध येथे गेला होता. रात्री ८.३० वाजतापर्यंत घरी न परतल्यामुळे त्याला पाहण्यासाठी बिंझली येथील कन्हार मोहल्यातून त्याचा भाऊ सुनील धनसिंग लिल्हारे (२८) हा मोटारसायकलने पाहण्यासाठी गेला.

The murder of a young man from an old dispute | जुन्या वादातून तरुणाचा खून

जुन्या वादातून तरुणाचा खून

ठळक मुद्देबिंझली येथील घटना : तीन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : हैदराबाद येथे मजुरीला गेलेल्या लोकांमध्ये वाद उद्भवल्याने त्या वादाचा वचपा होळीच्या दिवशी काढण्यात आला. तालुक्याच्या बिंझली येथील निलेश धनसिंग लिल्हारे (२४) या तरुणावर १० मार्चच्या रात्री ९ वाजता तिघांनी काठ्यांनी प्राणघातक हल्ला करुन त्याला यमसदनी पाठविले.
मागील चार महिन्यापूर्वी मृतक निलेश याने दारु पिऊन आरोपी पन्नालाल लिल्हारे याच्या सोबत वाद केला होता.त्या वादाचा वचपा म्हणून १० मार्चच्या रात्री ९ वाजता त्याचा खून करण्यात आला. निलेश मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजता सायकलने कावराबांध येथे गेला होता. रात्री ८.३० वाजतापर्यंत घरी न परतल्यामुळे त्याला पाहण्यासाठी बिंझली येथील कन्हार मोहल्यातून त्याचा भाऊ सुनील धनसिंग लिल्हारे (२८) हा मोटारसायकलने पाहण्यासाठी गेला. कन्हारटोल्याच्या रस्त्यावरील वळणावर परत येत असताना रात्री ९ वाजले होते. रस्त्यावर एक सायकल पडलेली दिसली. त्या सायकलवर मोटारसायकलचा प्रकाश पडताच त्या सायकलच्या थोड्या पुढे प्रवीण श्रीराम ढेकवार (३८), प्रकाश भरतलाल लिल्हारे (२४) रा. बिंझली हे काठीने निलेशला मारताना दिसले. पन्नालाल भरतलाल लिल्हारे हा लाथाने मारीत होता. जेव्हा सुनीलच्या मोटरसायकलचे लाईट त्यांच्यावर पडले तेव्हा ते तिघेही तिथून पळाले. त्यानंतर ते पडलेल्या व्यक्तीजवळ जाऊन मोबाईलच्या लाईटने पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा भाऊ निलेश होता. निलेश सोबत बोलण्याचा प्रयत्न केला परंतु निलेश बोलू शकत नव्हता. बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या निलेशला पाहून सुनील घाबरुन मोटारसायकलने घरी गेला व काका आणि इतर भावंडांना सागून त्या ठिकाणी आले. परंतु त्याच्या येण्यापूर्वीच निलेशचा मृत्यू झाला होता.
या संदर्भात सालेकसा पोलिसात तक्रार करण्यात आली. निलेश हैद्राबादच्या करीमनगर येथे काम करीत असताना पन्नालाल भरतलाल लिल्हारे (२८) याच्यासोबत त्याचा वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी पन्नालालने आतेभाऊ प्रवीण व प्रकाश यांच्या मदतीने कट रचून खून केला. सदर घटनेसंदर्भात प्रवीण श्रीराम ढेकवार, पन्नालाल लिल्हारे व प्रकाश लिल्हारे तिन्ही रा. बिंझली या तिघांविरुद्ध सालेकसा पोलिसांनी भादंवि कलम ३०२, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

२ मार्चलाच दिली होती धमकी
नीलेश हा २ मार्च रोजी आपले भाऊजी रामकिशोर लिल्हारे रा. दरेकसा यांच्यासोबत बिंझलीच्या चौकात गेले असताना त्यावेळी आरोपी पन्नालाल भरतलाल लिल्हारे याने निलेशला ठार करण्याची धमकी दिली होती. या धमकीला गांभीर्याने न घेतल्यामुळे सदर खुनाची घटना घडली.

Web Title: The murder of a young man from an old dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून