अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST2021-05-11T04:31:08+5:302021-05-11T04:31:08+5:30

गोंदिया : मागील तीन-चार वर्षांपासून गावातील एका महिलेसोबत संबंध ठेवून तिला नागपूरला पळवून नेले. परत गावात आणल्यावर तिच्या तरुण ...

Murder of a person having an immoral relationship | अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा खून

अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा खून

गोंदिया : मागील तीन-चार वर्षांपासून गावातील एका महिलेसोबत संबंध ठेवून तिला नागपूरला पळवून नेले. परत गावात आणल्यावर तिच्या तरुण मुलांचा छळ करायचा. यामुळे त्याचा खून त्याच्या प्रेयसीच्या मुलांनीच केल्याची घटना १० मे च्या दुपारी २.३० वाजता मूरपार येथील शेतातील झोपडीत घडली.

जयप्रकाश बसंतलाल लिल्हारे (वय ४५, रा. मूरपार) असे मृताचे नाव आहे. मृतक जयप्रकाश बसंतलाल लिल्हारे याचे मागील तीन-चार वर्षांपासून गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधापोटी त्याने तिला नागपूरला पळवून नेले. तिच्यासोबत त्याने नागपुरात दोन वर्षे काढली. मागील एक वर्षापासून तो मूरपार येथे परतल्यावर गावापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या शेत शिवारात झोपडी करून राहत होता, तर त्या महिलेचा पती व मुले आपल्या घरी राहत होते. परंतु मृत जयप्रकाश लिल्हारे याने ज्या महिलेला पळवून नेले होते, तिच्या मुलांना तुझ्या आईला मी पळविले, परंतु तुम्ही काहीच करू शकले नाही म्हणून त्यांचा छळ करायचा. याचा वचपा म्हणून आरोपी कोमल रामचंद्र रणगिरे (३३) व रूपेश रामचंद्र रणगिरे (१९, दोन्ही रा. मुरपार) या भावंडांनी चाकूने मारून त्याचा खून केला. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत.

बॉक्स

विम्याच्या ३.५० लाखांचाही होता वाद

आरोपी कोमल रणगिरे याच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या नावाने असलेल्या विम्याच्या पाॅलिसीवर नॉमिनी म्हणून पळून गेलेल्या महिलेचे नाव होते. पॉलिसी सुरूच असताना नॉमिनीचे नाव बदललेले नव्हते. रमचंद्र रणगिरे यांच्या नावाने असलेल्या तीन लाख ५० हजार रुपये विम्याचे पैसे पळून गेलेल्या आपल्या आईला मिळू नये म्हणून आरोपी मुलांचा प्रयत्न होता. हा देखील वाद त्यांच्यात सुरू असल्याची माहिती आहे. या दिशेने देखील रावणवाडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Murder of a person having an immoral relationship