महानगरपालिका नगर परिषद कटक मंडळ शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST2021-01-25T04:30:24+5:302021-01-25T04:30:24+5:30
गोंदिया : शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच महानगरपालिका, नगर परिषद व कटक मंडळातील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी राज्याचे अन्न व ...

महानगरपालिका नगर परिषद कटक मंडळ शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावा
गोंदिया : शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच महानगरपालिका, नगर परिषद व कटक मंडळातील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी लवकरच या विषयाच्या अनुषंगाने विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असून या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या वेळी शिष्टमंडळाने त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रधान सचिव महेश पाठक यांना दिले. त्यांनी सर्व समस्या ऐकून घेत त्या योग्य असल्याचे सांगत महानगरपालिका आणि नगर परिषद, कटक मंडळ शिक्षकांवर अन्याय झाला आहे. असे मान्य केले तसेच या संदर्भात लवकरच शिक्षक सहकार संघटनेची संबंधित विभागाच्या संचालकांशी बैठक घेऊन या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच शिष्टमंडळाने सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव आंधळे यांची भेट घेऊन महानगरपालिका व कटक मंडळातील १०० बिंदुनामावलीसंदर्भात चर्चा केली. त्यांनीही सर्व नगर परिषद, महानगरपालिकांना लवकरात लवकर १०० नामावली नोंदवही विभागीय मागासवर्ग कक्ष यांच्याकडून तपासून अद्ययावत ठेवावी, यासंदर्भात पत्रव्यवहार केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे महानगरपालिका आणि नगर परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मार्गी लागण्याची आशा बळावली आहे. शिष्टमंडळात नेतृत्व संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी केले. शिष्टमंडळात राज्य संघटक गजानन देवकत्ते, नागपूर विभागप्रमुख भालचंंद्र अंबुले, कोकण सरचिटणीस अनिल नाचपल्ले, राज्य कार्यकारिणी सदस्य विलास बांगर, नाशिक जिल्हा सचिव सुनील कैरमकोंडा यांचा समावेश होता.