लेटलतीफ कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:11 AM2017-12-15T01:11:43+5:302017-12-15T01:12:04+5:30

नगर परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नसल्याने नागरिकांची कामे होत नसल्याची ओरड वाढली होती. याची तक्रार नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्याकडे केली.

Municipal Chief of Staff for Liechtenstein | लेटलतीफ कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांचा दणका

लेटलतीफ कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांचा दणका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नसल्याने नागरिकांची कामे होत नसल्याची ओरड वाढली होती. याची तक्रार नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्याकडे केली. तक्र ारीची गांभीर्याने दखल घेत इंगळे यांनी बुधवारी (दि.१३) रोजी नगर परिषदेच्या विविध विभागांना सकाळी पावणे नऊ वाजता भेट दिली. या दरम्यान अनेक कर्मचारी कार्यालयात आलेच नसल्याचे व काही अनुपस्थित असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी लेटलतीफ कर्मचाºयांच्या एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश मुख्याधिकारी चंदन पाटील यांना दिले.
गोंदिया नगर परिषद अ वर्ग आहे. विविध कामांकरिता नागरिकांचा दररोज नगर परिषदेशी संर्पक येतो. मात्र नगर परिषदेत एकही कर्मचारी जागेवर भेटत नसल्याने नागरिकांची कामे वेळेत होत नव्हती. एकाच कामासाठी नगर परिषदेच्या वांरवार चकरा मारुन नागरिक हैराण झाले होते. शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. नगराध्यक्ष इंगळे यांनी विविध विकास कामांचा आराखडा तयार केला. त्यावर तातडीने काम करण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या आहेत. मात्र यानंतरही कर्मचारी वेळकाढूपणा करीत आहेत. वरिष्ठांना कुठलीही सूचना न देता काही कर्मचारी अनुपिस्थत राहत आहेत. कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा येत असल्याची बाब इंगळे यांच्या निदर्शनास आली. ही बाब गंभीरपणे घेत इंगळे यांनी बुधवारी नगर परिषदेच्या स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कर, महिला व बाल कल्याण, लोकपाल, लेखा, लायसेन्स, प्रशासन आदी विभागांना सकाळी ९.४५ वाजता भेट दिली. या आकस्मिक भेटीत अनेक कर्मचारी अनुपिस्थत आढळले. यानंतर लगेच त्यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रकार मुळीच खपवून घेणार नसल्याचे खडसावून सांगितले. तसेच दांडी बहाद्दर कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश मुख्याधिकारी चंदन पाटील यांना दिले.
या वेळी नगरसेवक विवेक मिश्रा, सतीश मेश्राम, पप्पू अरोरा, दीपक कदम, राजा कदम, मुजीब पठाण, चंद्रभान तरोणे, प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे उपस्थित होते.

Web Title: Municipal Chief of Staff for Liechtenstein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.