शिक्षक संघाच्या धरणे आंदोलनामुळे समस्या मार्गी
By Admin | Updated: July 27, 2014 23:49 IST2014-07-27T23:49:38+5:302014-07-27T23:49:38+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने पं.स. कार्यालय गोंदियासमोर तालुकाध्यक्ष अनिरूध्द मेश्राम यांच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊने धरणे

शिक्षक संघाच्या धरणे आंदोलनामुळे समस्या मार्गी
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने पं.स. कार्यालय गोंदियासमोर तालुकाध्यक्ष अनिरूध्द मेश्राम यांच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊने धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शिक्षकांच्या अनेक समस्या मार्गी लागल्या.
शिक्षक संघाचे आनंद पुंजे, नूतन बांगरे, वीरेंद्र कटरे, डी.टी. कावळे यांच्या मार्गदर्शनात धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपसभापती चमनलाल बिसेन, खंडविकास अधिकारी एस.के. वालकर, गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांना देण्यात आले.
१२ शिक्षकांचे एप्रिल, मे, जून २०१४ चे वेतन ३० जुलैपर्यंत बँक खात्यामध्ये जमा होणार, सर्व शिक्षकांचे जून २०१४ चे वेतन सुध्दा लवकरात देण्यात येतील, एमएससीआयटी प्रमाणपत्राकरिता शिक्षकांची वेतनवाढ जुलै २०१४ मध्ये थांबविण्यात येणार नाही. पात्र शिक्षकांनी एमएससीआयटी प्रमाणपत्र परीक्षा सहा महिन्याच्या आत पूर्ण करावी, केंद्र प्रमुखाचे वेतन एप्रिल, मे २०१४ चे वेतन बँकेत जमा झाले, शालार्थ आॅनलाईन वेतन बीआरसीमध्ये संगणक आॅपरेटरव्दारे प्रत्येकी दोन-दोन केंद्राचे करण्यात येतील, शालेय पोषण आहाराचे थकीत बिल मुख्याध्यापक व स्वयंपाकी बाईचे सप्टेंबर २०१३ ते एप्रिल २०१४ पर्यंत देना बँक शाखा गोंदिया येथे पाठविण्यात आले. जि.प. गोंदियाकडून शालेय गणवेशाची राशी आल्यास मुख्याध्यापकांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात येईल, शिक्षकांचे रजा प्रकरणे त्वरित काढण्यात येतील, शिक्षण सेवकांचे सहाव्या वेतन आयोगाचे १ ते ४ हफ्ते त्वरित पाठविण्यात आले.
धरणे आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता तालुकाध्यक्ष अनिरूध्द मेश्राम, सरचिटणीस गणेश चुटे, एस.यु. वंजारी, केदार गोटेफोडे, नागसेन भालेराव, नान बिसन, यशोधरा सोनवाने, अजय चौरे, एम.आर. बोपचे, अयुब खान, चंद्रशेखर दमाहे, विनोद सुर्यवंशी, यु.एन. उपवंशी, हेमंत पटले, लिकेश हिरापुरे, नरेंद्र जे. कटरे, सी.एस. सुर्यवंशी, किशोर शहारे, कृष्णा कापसे, वाय.डी. पटले, विनोद लिचडे, मोरेश बडवाई, रेणुका जोशी, एस.पी. कुंभलकर, दिलीप हरिणखेडे, रेखा ठाकरे, नंदकिशोर चित्रीव, आनंद मेश्राम, श्रीधर पंचभाई, दुर्गेश रहांगडाले, डी.डी. भगत, जे.एच. गेडाम, शैलेश गौतम, आर.डी. पारधी, वा.बी. चावके, नरेंद्र ठाकूर, शिवचंद शरणागत, कैलास डुमरे, एम.एस. नांदगाये, आर.एन. घारपिंडे, राजेश निंबार्ते, मयुर राठौड, एस.एम. बिसेन, एम.जी. हटिले, डी.एस. कोल्हे, सी.एस. कोसरकर, लखन लिल्हारे, करुणा मानकर व इतर शिक्षकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)