शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

एसटी कर्मचाऱ्यांचे स्थानकावर आंदोलन

By admin | Updated: December 20, 2014 01:48 IST

केंद्र शासनाच्या प्रस्तावित रस्ता वाहतूक व सेप्टी बिल २०१४ च्या नवीन कायद्यामुळे एसटीच्या परिचालनात अनेक बाधा व समस्या निर्माण होतात.

गोंदिया : केंद्र शासनाच्या प्रस्तावित रस्ता वाहतूक व सेप्टी बिल २०१४ च्या नवीन कायद्यामुळे एसटीच्या परिचालनात अनेक बाधा व समस्या निर्माण होतात. याचा संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. गुरुवारी १८ डिसेंबर रोजी गोंदियाच्या बस स्थानकावर एसटीच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा निषेध नोंदवून आंदोलन केले.सदर आंदोलनात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी गोंदिया बस स्थानकावर आपल्या हातात फलक व झेंडे घेवून नवीन कायद्यात प्रस्तावित बदलास घेवून विरोध दर्शविला. त्यांनी आपल्या मागण्यांवर शासनाने लक्ष देण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्यांमध्ये खासगी वाहनांना बस स्थानकावर उभे करून प्रवाशी भरणाऱ्या वाहनांना क्रमवार परवाना देवू नये, निविदा पद्धतीने प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना घेणाऱ्यांवर रोक लावावे, रस्त्यांवर वाहतूक व सुरक्षा बिल २०१४ मध्ये एसटीवर लादण्यात आलेल्या अनेक मारक कलमांना रद्द करावे, प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीच्या बसांचा विस्तार करावा व एसटीच्या विकासासाठी सहकार्य करावे, नवीन बसेसचा पुरवठा करावा आदी मागण्यांना घेवून एक दिवशीय आंदोलन करण्यात आले.आंदोलनाबाबत सांगण्यात आले की एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक समस्येशी लढत आहे. महामंडळाकडे शासन लक्ष देत नसल्यामुळे एसटीची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. तसेच नवीन कायदा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांवर त्याचा काय प्रभाव पडेल, याची कल्पनासुद्धा कर्मचाऱ्यांना नाही. अशात राज्यभरात एसटी महामंडळाच्या बस स्थानकात नवीन बसेसची मागणी असल्यावरही फेऱ्यांसाठी बसेस उपलब्ध नाहीत. या संदर्भात शासनाशी वेळोवेळी पत्र व्यवहारसुद्धा करण्यात आला. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीने ही बाब उचलून धरली नाही व शासनानेसुद्धा लक्ष दिले नाही. अशात केंद्र शासनाच्या रोड ट्रान्सपोर्ट व सेफ्टी बिल २०१४ नवीन प्रस्तावित कायद्यात बदल झाल्याने याचा सर्वाधिक प्रभाव एसटी महामंडळावर पडणार आहे. तरीसुद्धा शासनाला याचे काही देणे-घेणे नाही.या संदर्भात महामंडळावर होणारा केंद्र शासनाच्या नवीन कायद्याचा प्रतिकूल प्रभाव पाहता, या मुद्याला हिवाळी अधिवेशनात अनेक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत संघटनेचे एक प्रतिनिधी मंडळ दिल्लीला गेल्याची माहितीसुद्धा मिळाली आहे. (प्रतिनिधी)