शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपंग विद्यार्थ्यांच्या पालकांचे आंदोलन

By admin | Updated: February 1, 2015 22:59 IST

अपंग मुलांच्या शिक्षणासाठी शासन केवळ दाखविण्यासाठी कायदे करते. प्रत्यक्ष हे अपंग मात्र वंचितच राहतात. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी विशेष गरजाधारक विद्यार्थी पालक

गोंदिया : अपंग मुलांच्या शिक्षणासाठी शासन केवळ दाखविण्यासाठी कायदे करते. प्रत्यक्ष हे अपंग मात्र वंचितच राहतात. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी विशेष गरजाधारक विद्यार्थी पालक संघाच्या वतीने सोमवारी २ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना रोज व नियमित विशेष शिक्षण मिळावे, अपंग विद्यार्थ्यांना नियमित अपंग शिक्षणातील शिक्षण घेतलेल्याच शिक्षकांकडून शिक्षण देण्यात यावे, अपंग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अपंग शिक्षणातील पदवी व पात्रता असलेल्य शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, कर्णबधीर विद्यार्थ्यांना अपंगाचे शिक्षण घेतलेल्या शिक्षकांद्वारे शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी, अपंग विद्यार्थी दाखल असलेल्या शाळांमध्ये अपंग शिक्षणाची पात्रता व पदवी असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अनुकूलीत अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.अपंग व्यक्ती समान संधी कायदा १९९५ व बालकांचा कायद्यानुसार (आरटीई २००९) नियमित गरजेनुरूप व मातृभाषेतून शिक्षण मिळणे बंधनकारक आहे. पण अपंग मुलांना शाळेमध्ये फक्त कुबड्या, चाकाचे सायकल, चष्मे, कानाची मशीन याशिवाय दुसरे काहीही मिळत नाही. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा विशेष शिक्षक येतात, शिकवितात व दुसऱ्या अपंग मुलांकडे शिकविण्यासाठी निघून जातात. चांगल्या मुलांना रोजच पूर्णवेळ शिक्षक शिकवितात. मग अपंग मुलांना आठवड्यातून केवळ दोनच दिवस का शिकविले जाते, असा सवाल अपंग मुलांच्या पालकांनी केला आहे. शाळेतील शिक्षक म्हणतात की आम्ही अपंग मुलांना शिकवू शकत नाही. अपंग मुलांना शिकविण्यासाठी अपंगांचे शिक्षण घेतलेले शिक्षक हवे आहेत.मतिमंद, मुकबधीर, अंध मुलांसाठी वेगळे शिक्षक असतात. मग आमच्या मुलांना कोण शिकविणार, असाही प्रश्न सर्व विशेष गरजाधारक अपंग विद्यार्थी पालकांनी विचारला आहे. शासन अपंगांसाठी केवळ दाखवायचे कायदे करतो. कायदा सर्व मुलांसाठी सारखा असावा. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठीच विशेष गरजाधारक विद्यार्थी पालक संघाने सदर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)