ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 02:23 PM2021-10-17T14:23:06+5:302021-10-17T14:26:07+5:30

ट्रकची दुचाकीला जबर दडक बसून दुचाकीचालक ठार तर, मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजता चंद्रभागा नाक्याजवळ घडली.

Motorcyclist killed in truck collision, one critical | ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार, एक गंभीर

ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार, एक गंभीर

Next

गोंदिया : भरधाव वेगात असलेल्या ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकल चालक तरुण जागीच ठार झाला, तर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत चंद्रभागा नाका जवळ रविवारी (दि. १७) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव प्रीतेश पन्नालाल डोहरे (२३, रा.मुर्री) असे आहे.

प्रीतेश पन्नालाल डोहरे व तुळसाबाई पन्नालाल डोहरे (५०, दोघेही रा. मुर्री) मोटारसायकल क्रमांक एमएच ३५ एक्यू ०६५९ ने भंडारा येथील तेरवीच्या कार्यक्रमाकरिता जाण्यासाठी घरून निघाले. दरम्यान, चंद्रभागा नाका येथून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३४ बीजी ०८६७ च्या चालकाने ट्रक भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून प्रीतेशच्या मोटारसायकलला धडक मारली.

यामध्ये प्रीतेश डोहरे जागीच ठार झाला, तर तुळसाबाई डोहरे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचाराकरिता पाठविले असता गोंदियाला रेफर करण्यात आले. ट्रक चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोनि ईश्वर हनवते करीत आहेत.

Web Title: Motorcyclist killed in truck collision, one critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Accidentअपघात