२१ हजाराच्या दारुसह मोटारसायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:48+5:30

सध्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने दारुची वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. तालुक्यापासून काही अंतरावर गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे. गौरनगरच्या काही अंतरावर आंतरजिल्हा नाकाबंदी चेकपोस्ट उभारुन तिथे ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Motorbike seized with 21 thousand liquor | २१ हजाराच्या दारुसह मोटारसायकल जप्त

२१ हजाराच्या दारुसह मोटारसायकल जप्त

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव पोलिसांची कारवाई : आरोपी फरार,गडचिरोली जात होती दारु

लोकमत न्यूज नेटवर्क

अर्जुनी मोरगाव : दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोटारसायकलने दारुची तस्करी करीत असलेल्या इसमाला अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र दारुचा साठा आणि मोटारसायकल सोडून आरोपी फरार झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास गौरनगर येथे करण्यात आली.
सध्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने दारुची वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. तालुक्यापासून काही अंतरावर गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे. गौरनगरच्या काही अंतरावर आंतरजिल्हा नाकाबंदी चेकपोस्ट उभारुन तिथे ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रविवारी (दि.२९) दुपारी ३.२० वाजता पोलीस निरीक्षक महादेव तोंदले आपल्या ताफ्यासह सदर मार्गावर गस्त घालून नाकाबंदी चेक पोस्टची पाहणी करीत होते.दरम्यान आसोलीकडून गडचिरोली जिल्ह्यात मार्गक्रमण करण्यासाठी एक इसम स्कुटीवर पोत्याची गाठोडी घेऊन येत असताना पोलिसांना दिसला. सदर ठिकाणी पोलीस दिसताच त्यांनी आल्या त्या मार्गने परत जाण्यासाठी मोटारसायकल वळविल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. ठाणेदार तोंदले यांनी पोलीस हवालदार निकोडे, पोलीस शिपाई निरगुडे यांना त्यांचा पाठलाग करण्यास सांगितले. पाठलाग करतांना पोलीस दिसताच देशी दारुची वाहतूक करणाºया त्या इसमाने दारुच्या पोत्यासह मोटारसायकल रस्त्यावरच ठेऊन दुसºया मार्गाने पळ काढून पोबारा केला.
स्कुटी व दारुचे पव्वे ठेवलेले पोते नाकाबंदी चेक पोस्टवर आणून तपासणी केली. दोन बोरीमध्ये ७०० नग देशी दारुचे ९० एमएल, किमत २१ हजार रुपये तसेच होंडा अ‍ॅक्टीव्हा एमएच ३३ एक्स ८१३८ अंदाजे ३० हजार किमतीची दारु जप्त करुन कारवाई केली.
ठाणेदार महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनाखाली चेक पोस्ट येथे कर्तव्यावर असलेले शिवदास निकोडे, सोडगीर, निरगुडे, वाघाळे, एसएसटी पथकाचे पोलीस शिपाई रेगिवाले, ग्रामसेवक ,जनबंधू, छायाचित्रकार साखरे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Motorbike seized with 21 thousand liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.