आईचे दुष्प्रभाव मुलीवर टाळण्यासाठी केली हत्या
By Admin | Updated: August 11, 2015 02:22 IST2015-08-11T02:22:40+5:302015-08-11T02:22:40+5:30
महिलेचे मुंडके धडावेगळे करून तिची हत्या करण्याच्या प्रकरणाने तिरोडा तालुक्यातील गंगाझरीच्या पोलीस

आईचे दुष्प्रभाव मुलीवर टाळण्यासाठी केली हत्या
काचेवानी : महिलेचे मुंडके धडावेगळे करून तिची हत्या करण्याच्या प्रकरणाने तिरोडा तालुक्यातील गंगाझरीच्या पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डब्बेटोलाचा परिसर हादरून गेला होता. पण अल्पावधीतच या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावण्यात पोलिसांना यश आले. सख्ख्या पुतण्यानेच काकूची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. या हत्येची कबुली देताना आरोपीने काकूच्या चारित्र्याचा दुष्परिणाम तिच्या मुलीवर पडू नये म्हणून आपण तिची हत्या केल्याची कबुली दिली.
गेल्या १७ जुलैच्या सायंकाळी बोरा आणि डब्बेटोल्याच्या मध्यभागी असलेल्या नाल्यात बिंदूूबाई योगीलाल केवट (४०) हिचा मुंडके धडावेगळे केलेला मृतदेह आढळला. अशा निर्दयीपणे कोणी तिला मारले असावे हा प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. आरोपीचे ऋषीपाल मदनलाल केवट (२४) आणि मृतक बिंदूूबाई यांचे खरे तर काकू-पुतण्याचे नाते. पण काकू बिंदूूबाई हिच्या चारित्र्यामुळे ऋषीपाल नेहमी अस्वस्थ व्हायचा. परिवाराची बदनामी होत असल्याने आपण अनेक वेळा तिला समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र ती समजायला तयार नव्हती.
काकूची मुलगी अकराव्या वर्गात गेल्याने आईच्या चारित्र्याचा प्रभाव मुलीवर पडू नये म्हणून मी स्वत: एकट्याने काकीचा गळा कापून तिची हत्या केल्याचे आरोपी ऋषीपाल याने गंगाझरी पोलिसांना सांगितले.
बेरडीपार येथे वास्तव्यास असणाऱ्या एका बांधकाम मिस्त्रीसोबत अनेक वर्षांपासून असलेले काकूचे संबंध सर्वांना माहित होते. यासंबंधी दोन्ही घरचे लोक त्रस्त होते. त्यांनी आपले चारित्र्य सुधारावे म्हणून दोन्ही परिवारातून त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला जात होता. बिंदूूबाईला मजुरीच्या कामावर जावू नको, असेही बजावण्यात आले होते. मात्र मला घर परिवार चालवायचा आहे. दुसऱ्याजवळ कामे नसल्याने आपण त्याच्याजवळ कामे करायला जाणार, असे उत्तर मृतक बिंदूूबाई देत असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
हत्येच्या या घटनेत आपल्यासोबत इतर कोणीही नसल्याचे आरोपीने सांगितले. या प्रकरणाचा तपास तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी देवीदास ईलमकर व गंगाझरीचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डोंगरे पाटील, हवालदार टिकाराम चौधरी आणि पोलीस शिपाई मेंढे करीत आहेत. (वार्ताहर)
अशी केली हत्या
४१५ जुलै २०१५ ला सायंकाळी धान्य दळण्यासाठी जात असताना सोनेगावकडे जाणाऱ्या नाल्यात बिंदूबाई आणि तिच्या प्रियकराला ऋषीपालने पाहिले. मात्र ही बाब त्याने कोणाला सांगितली नाही. परंतु ही बाब त्याला चांगलीच खटकत होती. यातूनच काकूची कटकट कायमची दूर करण्याचा विचार त्याने पक्क केला.
४१६ जुलैच्या सकाळी ८.३० ते ९ दरम्यान बिंदूबाई नेहमीप्रमाणे कामाला जाण्याकरिता घरुन निघाली. चिट्आ पाठोपाठ आरोपी ऋषीपालसुद्धा गेला. डब्बेटोला ते बोरा या दोन गावाच्या मध्यभागी गुरेढोरे चारण्याचे मैदान असून बाजूला नाला आहे. समजूत घालण्याकरिता म्हणून ऋषीपालने तिला नाल्याच्या बाजुने नेले.
४आरोपीने मृत बिंदूबाईला वारंवार समजविण्याचा प्रयत्न केला. मुलीवर आईच्या चारित्र्याचा दुष्प्रभाव पडू नये म्हणून तरी तिने चारित्र्य सुधारावे असे त्याचे म्हणणे होते. पण ती ऐकत नसल्याचे पाहून ऋषीपालचा राग अनावर झाला आणि त्याने काकूला खाली पाडले आणि मासोळ्या कापण्याच्या सत्तुरने गळा कापून मुंडके धडावेगळे केल्याचे पोलिसांना सांगितले.
असा झाला उलगडा
४गंगाझरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ जुलैच्या सकाळी ८.३० ते ९ वाजता घडली. त्या रात्री बिंदूबाई घरी परतली नाही. १७ जुलैला एका व्यक्तीला तिचा मृतदेह दिसला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पोलिसांना ही माहिती मिळाली. घटनास्थळी गेल्यावर नाल्याच्या एका बाजूला धड होते तर २५ फुटावर नाल्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावर मुंडके ठेवलेले होते. त्या मुंडक्याजवळ जेवणाचा डबासुद्धा असल्याचे पीएसआय श्रीकांत डोंगरे पाटील यांनी सांगितले.