मनरेगाचे झाले १४ लाख मनुष्य दिवस काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:00:57+5:30
मागेल त्याला काम देण्यासाठी केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अमंलात आणली. या योजनेच्या माध्यामातून ग्रामीण भागातील रस्ते, पांदण रस्ते, शेततळी, वनतळी, तलाव खोलीकरण, बांध्या खोलीकरणाचे काम केले जातात. दवरर्षी दिवाळी झाल्यानंतर मनरेगाच्या कामांना सुरूवात केली जाते.यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे मनरेगाच्या कामावरही परिणाम झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ८८ हजार ६६ कुटुंबाना रोहयोचे काम मिळाले.

मनरेगाचे झाले १४ लाख मनुष्य दिवस काम
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागाचा विकास करणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेच्या कामांवरही यंदा कोरोनाचे संकट ओढावले आहे. दरवर्षी मनरेगाचे कोट्यवधी मनुष्य दिवस काम होत असताना यंदा केवळ १४ लाख २१ हजार मनुष्य दिवस काम गोंदिया जिल्ह्यात झाले आहे. यातील फक्त ५१ कुटुंबांना शंभर दिवस काम मिळाले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
मागेल त्याला काम देण्यासाठी केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अमंलात आणली. या योजनेच्या माध्यामातून ग्रामीण भागातील रस्ते, पांदण रस्ते, शेततळी, वनतळी, तलाव खोलीकरण, बांध्या खोलीकरणाचे काम केले जातात. दवरर्षी दिवाळी झाल्यानंतर मनरेगाच्या कामांना सुरूवात केली जाते.यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे मनरेगाच्या कामावरही परिणाम झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ८८ हजार ६६ कुटुंबाना रोहयोचे काम मिळाले. त्या कामांवर काम करणाºया मजुरांची संख्या १ लाख ३९ हजार ७६ होती. यातील मजुरांनी १४ लाख २१ हजार ६७७ मनुष्य दिवस काम केले आहे. यातील फक्त ५१ कुटुंबांना १०० दिवस काम मिळाले आहे. यातील ५ हजार २१८ कामे ही इंदिरा आवास योजनेची कामे आहेत.
आमगाव तालुक्यातील ६ हजार ५२५ कुटुंबातील ९ हजार ७७० मजुरांनी १ लाख ३ हजार ६९६ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम एकाही कुटुंबाला मिळाले नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९ हजार ८३८ कुटुंबातील १८ हजार ४७६ मजुरांनी १ लाख ५८ हजार २८८ मनुष्य दिवस काम केले.
यात शंभर दिवस काम ५ कुटुंबांना मिळाले आहे. देवरी तालुक्यातील ११ हजार २३ कुटुंबातील १९ हजार १८४ मजुरांनी १ लाख ७५ हजार ३४४ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम ५१ कुटुंबांना मिळाले आहे.
गोंदिया तालुक्यातील १९ हजार ७७१ कुटुंबातील २६ हजार २६७ मजुरांनी २ लाख ८६ हजार २०७ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम ७ कुटुंबांना मिळाले आहे.
गोरेगाव तालुक्यातील ६ हजार १८३ कुटुंबातील ९ हजार २२८ मजुरांनी ९६ हजार २६७ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम ३ कुटुंबांना मिळाले आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ९ हजार ६७२ कुटुंबातील १५ हजार २६१ मजुरांनी १ लाख ३१ हजार १३९ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम एकाही कुटुंबाला मिळाले नाही. सालेकसा तालुक्यातील ७ हजार ५०८ कुटुंबातील ११ हजार ६९७ मजुरांनी १ लाख ४५ हजार ७८० मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम ३ कुटुंबांना मिळाले आहे. तिरोडा तालुक्यातील १७ हजार ५४६ कुटुंबातील २९ हजार ८७८ मजुरांनी ३ लाख २४ हजार ९५६ मनुष्य दिवस काम केले. यात शंभर दिवस काम २८ कुटुंबांना मिळाले आहे.
सर्वाधिक घरकुलाची कामे अर्जुनी-मोरगाव तालुक्यात
मनरेगाच्या माध्यमातून घरकुलांची कामे करण्यात आली. यात सर्वाधिक कामे ही घरकुलांची मनरेगाच्या माध्यमातून कामे करण्यात आली. त्यात अर्जुनी-मोरगाव तालुका अव्वल ठरला आहे. आमगाव तालुक्यात ३ घरकुलांची कामे, अर्जुनी-मोरगाव २ हजार ९४० कामे, देवरी तीन कामे, गोंदिया १ हजार ८५८, गोरेगाव १२, सडक-अर्जुनी ११, सालेकसा ६, तिरोडा ३८५ अशी एकूण ५ हजार २१८ घरकुलांची कामे मनरेगातून करण्यात आली आहेत.