आमदारानी केली नुकसानीची पाहणी
By Admin | Updated: September 18, 2016 00:31 IST2016-09-18T00:31:44+5:302016-09-18T00:31:44+5:30
तालुक्यातील कन्हाळगाव येथे अतिवृष्टीमुळे पडलेल्या घराची पाहणी करीत आमदार संजय पुराम यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना मदत जाहीर करण्याचे निर्देश दिले.

आमदारानी केली नुकसानीची पाहणी
अधिकाऱ्यांना निर्देश : त्या कुटुंबांना लवकर मदत जाहीर करा
देवरी : तालुक्यातील कन्हाळगाव येथे अतिवृष्टीमुळे पडलेल्या घराची पाहणी करीत आमदार संजय पुराम यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना मदत जाहीर करण्याचे निर्देश दिले.
मागच्या आठवडत्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कन्हाळगाव निवासी अशोक राणे यांचे घर पूर्णत: कोसळले व त्यांना बेघर व्हावे लागले. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय पुराम यांनी घटनास्थळी भेट देवून राणे यांना कौटुंबिक आधार दिला व उपस्थित नायब तहसीलदार गुरुनुले यांना संबंधित कुटुंबप्रमुखाला लवकरात लवकर शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी असे निर्देश दिले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्य सविता पुराम, पं.स. सभापती देवकी मरई, पं.स. सदस्य अर्चना ताराम, भाजयुमोचे तालुका महामंत्री कुलदीप लांजेवार, उपसरपंच पुरुषोत्तम पारधी, तंटामुक्त समिती अध्यक्ष तेजराम लटये, नायब तहसीलदार गुरुनुले, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, ग्रामसेवक सानप व ग्रामवासी उपस्थित होते. (प्रतिनिधी)