मजीप्राने केले बंधाऱ्याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:53 IST2019-02-28T00:52:26+5:302019-02-28T00:53:39+5:30
शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने(मजीप्रा) पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षीत केले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले हे पाणी वाहून जावू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने बंधारा बांधकामाचे नियोजन के ले आहे.

मजीप्राने केले बंधाऱ्याचे नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने(मजीप्रा) पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षीत केले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले हे पाणी वाहून जावू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने बंधारा बांधकामाचे नियोजन के ले आहे. डांर्गोली येथे नदीत हा बंधारा बांधला जाणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया आटोपली आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ सोसावी लागली होती. गोंदिया शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र सुध्दा कोरडे पडले होते.यावर तोडगा म्हणून कधी नव्हे ते सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होेते. जिल्ह्यात प्रथमच असा हा प्रयोग करावा लागला होता.त्यामुळेच मागील वर्षी शहरातील पाणी टंचाईची समस्या सुटली होती. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व पाटबंधारे विभागाच्या सामंजस्यातून पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यात आली होती. यंदाही पाणी टंचाईची तीच स्थिती असून जिल्ह्यात पाणी टंचाई भासणार यात शंका नाही. अशात पाणी टंचाईची झळ शहरालाही बसणार हे सुद्धा तेवढेच खरे आहे. भविष्यातील हे चित्र बघून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने यंदाही शहरासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी आरक्षीत करून ठेवले आहे. त्यामुळे पाणी टंचाईची स्थिती दिसल्यास पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले पाणी वाहून जावू नये, यासाठी मजीप्राने बंधाऱ्याचे नियोजन करून ठेवले आहे.
मजीप्राने नदीत बंधारा बांधकामासाठी निविदा काढली असून सुमारे ५-६ लाखांचा यासाठी खर्च येणार असल्याची माहिती आहे. यात रेतीच्या पोतींचा बंधारा बांधला जाणार असून ४ महिन्यांसाठी त्याच्या देखरेखीची तरतूद करण्यात आली आहे. ऐनवेळी धावपळ होवू नये या दृष्टीने मजीप्राने बंधाºयाचे अगोदरच नियोजन केले आहे.
या बंधाºयामुळे प्रकल्पातून आलेले पाणी वाहून जाणार नाही व शहराला पाणी पुरवठा करण्यात अडचण येणार नाही.
मार्च अखेरपर्यंत पुरणार पाणी
डांर्गोली येथे नदीत मार्चच्या शेवटपर्यंत पाणी पुरणार एवढा पाणीसाठा असल्याची माहिती आहे. सध्या डांर्गोली येथील पंपाला पाणी येत असून पाण्याची गरज मार्च महिन्यात शेवटी पडणार आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कधी आणायचे यासाठी मजिप्राकडून नियोजन करण्यात आले नसल्याची माहिती आहे. मात्र लवकरच या विषयाला घेवून अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात पाणी आणण्यासाठीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती मजिप्राचे विभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी दिली.