बेपत्ता महिलेचा मृतदेह पांगोली नदीत आढळला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST2021-07-28T04:30:23+5:302021-07-28T04:30:23+5:30

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छोटा गोंदियाच्या भीमघाट पांगोली नदीत एका ४० वर्षाच्या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मंगळवारी ...

Missing woman's body found in Pangoli river () | बेपत्ता महिलेचा मृतदेह पांगोली नदीत आढळला ()

बेपत्ता महिलेचा मृतदेह पांगोली नदीत आढळला ()

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छोटा गोंदियाच्या भीमघाट पांगोली नदीत एका ४० वर्षाच्या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि.२७) च्या दुपारी २ वाजता आढळला. छाया सुधाकर ठाकरे (४०) रा. प्रगती कॉलनी छोटा गोंदिया असे मृत महिलेचे नाव आहे. मागील चार दिवसांपासून ती घरून बेपत्ता होती. तिचा घातपात, अपघात की आत्महत्या ही बाब स्पष्ट झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश बनसोडे, सहाय्यक फौजदार घनश्याम थेर यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. या घटनेची नोंद गोंदिया शहर पाेलिसांनी घेतली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे बचाव पथक पांगोली नदीत सराव करीत असताना हा मृतदेह आढळला.

Web Title: Missing woman's body found in Pangoli river ()