मिनी मेटाडोरची दुचाकीला धडक : विद्यार्थी ठार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:30 IST2021-09-19T04:30:14+5:302021-09-19T04:30:14+5:30

प्राप्त माहितीनुसार तुषार हा गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील मनिभाई ईश्वरभाई पटेल ज्यू. कॉलेजमध्ये शिकायला जातो. तो नेहमीप्रमाणे शुक्रवारी ...

Mini Matador hits two-wheeler: Student killed () | मिनी मेटाडोरची दुचाकीला धडक : विद्यार्थी ठार ()

मिनी मेटाडोरची दुचाकीला धडक : विद्यार्थी ठार ()

प्राप्त माहितीनुसार तुषार हा गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील मनिभाई ईश्वरभाई पटेल ज्यू. कॉलेजमध्ये शिकायला जातो. तो नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि.१८) कॉलेजमधून होंडा दुचाकी क्र. एमएच ३५,एबी ९९९६ ने परत येत होता. दरम्यान गोंदियाकडे जाणारा मिनी मेटाडोर क्र. एमएच ३५ एजी २२३९ चालक गौरीशंकर अशोक बिलथरे याने भरघाव वेगाने गाडी चालवून तुषारच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत तुषार गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला त्वरित १०८ रुग्णवाहिकेने गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आमगाव पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत चालक व मिनी मेटाडोरला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काॅन्स्टेबल हटवार व शिपाई हरिणखेडे करीत आहेत.

Web Title: Mini Matador hits two-wheeler: Student killed ()