रावणवाडी परिसरात दुधात भेसळ सुरूच
By Admin | Updated: August 12, 2014 00:01 IST2014-08-12T00:01:01+5:302014-08-12T00:01:01+5:30
दुधासारख्या अत्यावश्यक आणि प्रत्येक घरातील दैनंदिन गरज असणाऱ्या घटकात वाढत असलेली भेसळ सर्वांसाठी चिंतेचा विषय झाली आहे. काही बड्या लोकांच्या दूुध संस्थांमध्येही

रावणवाडी परिसरात दुधात भेसळ सुरूच
रावणवाडी : दुधासारख्या अत्यावश्यक आणि प्रत्येक घरातील दैनंदिन गरज असणाऱ्या घटकात वाढत असलेली भेसळ सर्वांसाठी चिंतेचा विषय झाली आहे. काही बड्या लोकांच्या दूुध संस्थांमध्येही या भेसळीला प्रोत्साहन दिले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. विशेष म्हणजे या भेसळीला आळा घालण्याची जबाबदारी ज्या अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
प्रत्येकाची दैनंदिन गरज असलेल्या दुधामध्ये रासायनिक वस्तंूची भेसळ केली जात आहे. असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाकडून उत्पादक व वितरक या दोघांवरही कारवाई होत नसल्याचे दिसते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात दुधापासूनच तयार केलेल्या चहापासून होते. तसेच पौष्टीक आहार म्हणून डॉक्टरदेखील रुग्णांना व लहान मुलांना दूध पिण्याचा सल्ला देतात. मात्र सध्या मिळण्याऱ्या दुधाच्या शुद्धीकरणावर त्यात भेसळीमुळे प्रश्न निर्माण झाले आहेत.
दररोज सेवन करीत असलेल्या दुधामध्ये पौष्टीकता कमी आणि भेसळ युक्त पदार्थांचा वापरच अधिक प्रमाणात होते. असे प्रकार अनेकदा अनेक ठिकाणी आढळून येत आहेत.बऱ्याच दूध विक्रेत्यांनी दुधात भेसळ करुन विक्री करण्याच्या आपला अनधिकृत व्यवसाय सुरू केला आहे. असा बेकायदेशिर व्यवसाय करून आपण आपल्याच लोकांच्या जीवनाशी खेळ करीत आहोत.
मागील काळात स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाने अनेक दूध डेअरींची तपासणी केल्या. त्यांनी खवा व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या व्यवसायांवर धाडी घातल्या. शेकडो किलो भेसळयुक्त खवा जप्त करून नाहिसा केला होता. काही दूध विक्रेत्यांच्या दुकानांमधून भेसळीकरिता साठवून ठेवलेल्या रासायनिक पदार्थाचा साठा जप्त केला होता. त्यावेळी याच रासायनिक पदार्थांपासून रासायनिक दुधाची निर्मिती होत असते, असे डेअरी संचालकापासूनच कळले होते.
बऱ्याच काळापासून एकाही दूध उत्पादकावर आणि वितरकावर कारवाई झाल्याचे ऐकण्यात आले नाही. त्यामुळे दूध विक्रेत्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच असून मानवी आरोग्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. या विरोधात विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. (वार्ताहर)