शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमधून मजुरांचे स्थलांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

बस व रेल्वेसह खाजगी वाहतूकही ठप्प झाली आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब मजुरांचे हाल झाले आहेत. या संकटाच्या काळात त्यांचा कुणीही वाली नाही. लॉकडाऊनमुळे मजुरांवर संकट कोसळले आहे. रोजगारासाठी बाहेर गेलेल्या मजुरांना आता घराकडची ओढ लागल्याने कुम्हारी (दुर्ग) छत्तीसगढ ते कटंगी (जि.बालाघाट) मध्यप्रदेश हा अडीशे कि.मी.चा पायी प्रवास करण्याची वेळ मजुरांवर आली आहे.

ठळक मुद्देकुटुबीयांसह अडीचशे कि.मी.चा पायी प्रवास : कोरोनामुळे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून शासनाने २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ केला आहे. परिणामी बस व रेल्वेसह खाजगी वाहतूकही ठप्प झाली आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब मजुरांचे हाल झाले आहेत. या संकटाच्या काळात त्यांचा कुणीही वाली नाही. लॉकडाऊनमुळे मजुरांवर संकट कोसळले आहे. रोजगारासाठी बाहेर गेलेल्या मजुरांना आता घराकडची ओढ लागल्याने कुम्हारी (दुर्ग) छत्तीसगढ ते कटंगी (जि.बालाघाट) मध्यप्रदेश हा अडीशे कि.मी.चा पायी प्रवास करण्याची वेळ मजुरांवर आली आहे.गोंदिया, भंडारा, गडचिरोली व मध्यप्रदेशातील छिंदवाडा, बालाघाट येथील मजूर रायपूर, दुर्ग, भिलाई येथे रोजगारासाठी जातात. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे.त्यामुळे छत्तीसगढ राज्यात अनेक ठिकाणी मजूर अडकले आहेत. बस सेवा, रेल्वे व खाजगी वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे आपले गाव कसे गाठावे असा प्रश्न मजुरांना पडला आहे.अशीच वेळ मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कटंगी व गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील दहा मजुरांवर आली. कटंगी येथील ८ मजूर कामानिमित्त कुम्हारी (दुर्ग) येथे होते. त्या मजुरांनी साधना अभावी पायपीट करीत सोमवारी (दि.३०) सकाळी नऊ वाजता डोंगरगढ, धानोली रेल्वे मार्गे आमगाव येथे दाखल झाले. रेल्वे मार्गाने पायपीट करताना त्यांना रात्री रेल्वे स्टेशनवर थांबण्यास मज्जाव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी २७ मार्चपासून प्रवास सुरू केला होता. कुम्हारी ते कटंगी हा २५० कि.मी.चा रस्ता पार करायचा होता. परंतु आमगाव येथे पोचल्यानंतर मजुरांची व्यथा बघून येथील अष्टविनायक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचा परिचय देत मदत केली. मजुरांना फळ बिस्कीटांचे वितरण केले. त्यानंतर पुन्हा या मजुरांनी आपला मोर्चा कटंगीकडे वळविला.अशीच स्थिती आमगाव तालुक्यातील बोथली व किडंगीपार येथील दोन मजुरांची झाली. ते रायपूर येथे मजुरी करण्यासाठी गेले होते.मात्र कोरोनामुळे तेथील काम बंद झाल्याने गावाकडे परतत आहे.यात कैलास भलावी, अतुल परते, रोहित पांढरे, सुरेंद्र पांढरे, गोविंद मरकाम, रवींद्र तुमळाम, उमेश कोकोडे, अरूण कोडवते यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या लढाईत सर्वत्र शुकशुकाटआमगाव : देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात २१ दिवसांचे ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले आहे. यामुळे नागरिक आपल्या घरात असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. येथील दवाखाना व औषधी दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद असल्याचे दिसून आले. शासनाने जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही अत्यावश्यक साहित्यांसाठी किराणा दुकाने सुरु आहे. मात्र नागरिकांकडून गर्दी केली जाणार नाही त्यासाठी प्रत्येक दुकानासमोर मार्र्कींग करुन ग्राहकांसाठी १-१ मिटर अंतरावर उभे राहण्यासाठी चौकोन करण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या