शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत मजुरांमुळे कोरोना दारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून देश ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. यामुळे देशभराततील उद्योगधंदे बंद पडले व याचा थेट फटका मजूर वर्गावर पडला. हाताला काम राहिले अशात मजुरांनी आपल्या घरची वाट धरली. प्रवासाची सुविधा नसल्याने मजुरांनी पायी प्रवास सुरू केला.

ठळक मुद्देतालुक्यात हजारो मजूर परतले । विलगीकरण कक्षात राहण्यास नकार

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ‘लॉकडाऊन’मुळे मोठ्या शहरांतून पायी प्रवास करीत आपल्या गावी परत येणाऱ्या स्थलांतरीत मजुरांनी गावातील विलगीकरण कक्षात न थांबता थेट घरातच मुक्काम केला आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे सुद्धा पालन ते करीत नसल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग दार ठोठावत असल्याची भीती निर्माण झाली आहे.देशात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून देश ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. यामुळे देशभराततील उद्योगधंदे बंद पडले व याचा थेट फटका मजूर वर्गावर पडला. हाताला काम राहिले अशात मजुरांनी आपल्या घरची वाट धरली. प्रवासाची सुविधा नसल्याने मजुरांनी पायी प्रवास सुरू केला. रस्त्यात एखादे वाहन मिळाले तर काही अंतर त्यातून तर कधी पायी चालत असे करीत त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला व आता आपल्या मूळ गावी पोहचू लागले आहेत. कित्येकांचा प्रवास सुरूच असून ते देखील पोहचतील. परंतु गावात पोहोचणारे मजूर गावाबाहेर विलगीकरण कक्षात न थांबता थेट आपल्या घरी दाखल होत आहेत.त्यातही ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन न करता घरातील लोकांमध्ये मिसळून राहत आहेत. त्यामुळे गावातील अन्य लोक मानसिकरित्या दहशतीत जगत आहेत. तालुक्यातील ग्राम बिंझली, कावराबांध, गोवारीटोला, बाम्हणटोला, पोवारीटोला, नवेगाव, बाम्हणी, सोनपुरी, पानगाव, मुंडीपार, रोंढा, निंबा, पिपरीया या व इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत मजूर गावात परतले आहेत. १-२ गावांत सरपंच व पोलीस पाटलांच्या सूचनेला मान देऊन काही जण विलगीकरण कक्षात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु ९० टक्के गावांमध्ये हे मजूर आपल्या मर्जीप्रमाणे वागत गावांमध्ये बिनधास्त फिरत आहेत.विलगीकरण कक्षात राहण्यासाठी अटीस्थलांतरीत मजुरांना जेव्हा विलगीकरण कक्षात राहण्यासाठी विनंती केली जाते तेव्हा ते राहण्यासाठी अटी-शर्ती मांडतात. दिवसातून ३ वेळा जेवण,चहा-नाश्ता, पाणी, साबण, ब्रश,पेस्ट व इतर दैनंदिन वस्तूंची पूर्तता नित्याने करावी तेव्हाच आम्ही विलगीकरण कक्षात राहू अशी अट मांडून आग्रह करणाºया सरपंच व पोलीस पाटलांना नि:शब्द करण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे, हे मजूर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, हैदराबाद आदि ‘रेड झोन’ मधील शहरांतून आल्याने हे धोकादायक आहे.

टॅग्स :Socialसामाजिक