कुटुंब नियोजनाची पुरुषांना भीती; गोंदिया जिल्ह्यात ८५ टक्के महिलांच्या शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:20+5:302021-02-09T04:32:20+5:30
गोंदिया : वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही संकल्पना समोर आणून लोकसंख्येवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

कुटुंब नियोजनाची पुरुषांना भीती; गोंदिया जिल्ह्यात ८५ टक्के महिलांच्या शस्त्रक्रिया
गोंदिया : वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही संकल्पना समोर आणून लोकसंख्येवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती आरोग्य विभागामार्फत केली जाते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट शासनाने प्रत्येक जिल्ह्याला दिले आहे. गोंदिया जिल्ह्याला ९ हजार २०० कुटुंब नियोजन करण्याचे उद्दिष्ट्ये वर्षाकाठी दिले आहे. परंतु मागील दोन वर्षांची परिस्थती पाहता कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट गोंदिया जिल्हा पूर्ण करू शकत नाही. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्याला ९ हजार २०० शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ७ हजार ६४० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात ११७० पुरुष व ६ हजार ४७० महिलांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत. सन २०२०-२१ या वर्षात डिसेंबरअखेरपर्यंत २४५ पुरुष, तर २ हजार ३७० महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात होतात. प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सायास केंद्र हे त्या शस्त्रक्रिया करतात. परंतु त्यांची बदली तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आल्याने यंदा तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दररोज केल्या जात आहे.
बॉक्स
कमजोरी येण्याच्या भीतीने घाबरतात
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमुळे पुरुष कमजोर होतो. घरातील कमविता व्यक्तीने शस्त्रक्रिया केली तर तो कमजोर होतो, जर असे झाले तर आपले घर कोण सांभाळणार, असा गैरसमज लोकांमध्ये आहेत. त्यामुळे कुटुंब नियोजन करण्यासाठी महिलांनाच पुढे केले जाते.
....
काेट
डॉ. सायास केंद्र तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणात कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. प्रसूतीदरम्यान कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येते. पुरुषांसाठी विशेष शिबिर घेऊन कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
डॉ. हिंमत मेश्राम
अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा
.......एक नजर ...शस्त्रक्रियांवर
सन २०१९-२०
एकूण शस्त्रक्रिया ७६७०
पुरुष-११७०
महिला- ६४७०
........
सन २०२०-२१ डिसेंबर अखेर
एकूण शस्त्रक्रिया २५६२
पुरुष-२४५
महिला- २३७०
........
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना पुरुषांना फक्त एक टाका लागतो. शस्त्रक्रिया झाल्यावर थोड्याच वेळात पुरुषांना सुटी देण्यात येते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमुळे कसलीही कमजोरी येत नाही.
-आशिष नारनवरे, शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती
.......
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याआगोदर आधी भीती वाटत होती. परंतु ही भीती क्षणार्धात नाहीशी झाली. इंजेक्शनचा जेवढा त्रास होतो तेवढाच त्रास या शस्त्रक्रियेचा होतो. त्यानंतर कसलाही त्रास किंवा कमजोरी वाटत नाही.
- उदाराम ब्राह्मणकर, शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती