शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

फुले दाम्पत्याची समाजसेवा स्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 6:00 AM

अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त्यात उडी घेऊन स्वत:चा जीव गमावला.

ठळक मुद्देछगन भुजबळ : महात्मा फुले पुतळा अनावरण व समाज मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : महात्मा फुले यांनी आपल्यासाठी अनेक कष्ट घेतले. देशाच्या अनेक राज्यात महात्मा फुले यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा १५०-२०० वर्षापूर्वीचा कार्यकाळ आहे. त्यावेळी अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त्यात उडी घेऊन स्वत:चा जीव गमावला. फुले दाम्पत्याची समाजसेवा जगाच्या इतिहासात दुसरी असूच शकत नसन स्मरणीय आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच छगन भुजबळ यांनी केले.तालुक्यातील ग्राम बोदरा देऊळगाव येथील अखिल भारतीय माळी समाज शाखा, ओबीसी समाज संघटना व देऊळगाव बोदरा ग्रामवासीयांच्यावतीने रविवारी (दि.१) आयोजित महात्मा फुले यांच्या पुतळ््याच्या अनावरण व समाज मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ विदर्भ प्रांताध्यक्ष राजेंद्र महाडोळे होते. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, अ. भा. फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस किशोर कन्हेरे, दिवाकर गमे, गायत्री इरले, ईश्वर बाळबुधे, गोंदिया जिल्हा माळी समाजाचे अध्यक्ष देविदास गुरनुले, विष्णू नागरीकर, राजेंद्र मांदाळे, माधुरी देशकर व प्रतिष्ठित मंडळी मंचावर उपस्थित होती.पुढे बोलताना ना. भुजबळ यांनी, महात्मा फुले यांची दूरदृष्टी किती मोठी होती ती अनेक उदाहरणांवरून लक्षात येते. त्यांनी दलितांना जवळ केल. सावित्रीबार्इंनी महिलांना शिक्षणाचे दालन उपलब्ध करून दिले. फुले यांनी खडकवासला येथे धरण बांधल. कात्रजचा बोगदा त्यांनी तयार केला. त्यांनी शेती करून हंगामात तीन-तीन पिके घेतली. पाझर तलावाची संकल्पना त्यांची आहे. मात्र त्यावेळी झिरपे तलाव हे नाव दिल होत. त्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ व ‘गुलामगिरी’ ही पुस्तके लिहिली. या पुस्तकांचे सामूहिक पठण झाले पाहिजे. या पठणामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकरी कसा नागवला जातो याचं ज्वलंत वर्णन या पुस्तकात आहे. भारतरत्न पुरस्कार यावरून सध्या आकाडतांडव सुरू आहे. गांधी हे महात्मा आहेत. फुले हे महात्मा आहेत. त्यांचे स्थान आपल्या हृदयात आहे मग भारतरत्न कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आ. चंद्रिकापुरे यांनी, ओबीसी संवर्गाला सामाजिक व शैक्षणिक आरक्षण मिळायला पाहिजे. एकसंघ भावनेने ओबीसींनी पुढे येत आपला आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविला पाहिजे. आपला संघर्ष अबाधित ठेवा. फितुरी करू नका. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा कायम ठेवा असे सांगीतले. यावेळी दिवाकर गमे, बापूसाहेब भुजबळ, गायत्री इरले, ईश्वर बाळबुधे व राजेंद्र महाडोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला बोदरा देऊळगाव येथील माळी समाजबांधव तसेच परिसरातील जनता मोठ्या संख्येत उपस्थित होती.ओबीसींनी एकत्र आले पाहिजेयाप्रसंगी ना. भुजबळ यांनी, १९३१ मध्ये इंग्रज राजवटीत देशाची जनगणना झाली. त्यावेळी ओबीसींची लोकसंख्या ५४ टक्के होती. आता परत वाढली आहे. त्यावेळी ओबीसींची जनगणना होत होती मग मग आता का नाही? असे ते म्हणाले. ओबीसींची जनगणना करण्याचे आश्वासन तत्कालीन केंद्र सरकारने दिले होते. मात्र २०२१ च्या जनगणनेसाठी रकानाच उपलब्ध नाही. याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. आम्ही ओबीसी आहोत असं म्हणत ओबीसींनी एकत्र आले पाहिजे. ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या सर्व जातींनी संघर्ष केला पाहिजे. संघर्षानंतर मिळणाºया लाभातून जातीला नव्हे तर ओबीसी प्रवर्गाला सवलती मिळतील असे ते म्हणाले.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेChhagan Bhujbalछगन भुजबळ