मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची बैठक

By Admin | Updated: July 17, 2015 01:20 IST2015-07-17T01:20:39+5:302015-07-17T01:20:39+5:30

विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनाच्या प्रांतीय कार्यकारिणीची बैठक ..

Meeting of Backward Classical Association | मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची बैठक

मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची बैठक

गोंदिया : विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनाच्या प्रांतीय कार्यकारिणीची बैठक रविवारी (दि.१२) संस्थेचे मुख्य कार्यालय गैरव निवास आंबाटोली येथे पार पडली. अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष मिलिंद मेश्राम होते. बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील मान्यवर प्रा.राजेश कांबळे यांचा संघटनेमार्फत शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संघटनेचे प्रतिनिधीत्व देताना संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रा. राजेश कांबळे यांची नेमणूक करण्यात आली. याप्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी कार्यकारिणीने गोंदिया जिल्ह्यात वन संवर्धन कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणासाठी २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला.
सभेत संघटनेचे प्रांतीय उपाध्यक्ष आनंद जांभूळकर, प्रांतीय महासचिव प्रा. दिलीप लांजेवार, प्रांतीय सचिव चंद्रशेखर पंचभाई, प्रांतीय कोषाध्यक्ष उमेंद्र टेंभरे, प्रांतीय प्रवक्ता योगेंद्र मेश्राम, प्रांतीय संघटक आर.डी. चौधरी, प्रचार प्रमुख विवेक राऊत, जनबंधू, खोब्रागडे, कांबडे, शिवणकर, गोरेगाव तालुका अध्यक्ष संजय साखरे, सचिव दिनेश अंबादे, दिगंबर रामटेके, प्रांतीय महिला संघटक डॉ. नूरजहा पठान, आरोग्य सेवक जी.डी. रंगारी, डी.आर. रंगारी, इतर सभासद व पदाधिकारी उपस्थित होते. संचालन योगेंद्र मेश्राम आणि आभार प्रा.डी.बी.लांजेवार यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Meeting of Backward Classical Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.