शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचे सीटीस्कॅन सहा महिन्यापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

मेडिकलमधील सिटी स्कॅन मशीन मागील सहा महिन्यापासून बंद आहे.नवीन सीटीस्कॅन मशिन येऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु ही मशीन चालू करण्यावर कोणतेही उपाय करण्यात आले नाही. जुनी बंद असलेली मशीन दुरूस्त करण्यासंदर्भात वैद्यकीय अधिष्ठातांनी कोणतीही हालचाल केली नाही. किंवा नवीन मशीन सुरू करण्याची तयारीही दाखविली नाही.

ठळक मुद्देरूग्णांचे हाल : गोरगरीब रुग्णांना १२ हजार हजार रुपयांचा भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरगरीबांच्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) सुरू करण्यात आले. परंतु जिल्हा सामान्य रूग्णालयापेक्षा निकृष्ट दर्जाचे सेवा देणारे हे वैद्यकीय महाविद्यालय आता स्वत:च आजारी पडले आहे. मागील सहा महिन्यापासून येथील रूग्णांना सीटीस्कॅनची सोय नाही.परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.येथील मेडिकलमधील सिटी स्कॅन मशीन मागील सहा महिन्यापासून बंद आहे.नवीन सीटीस्कॅन मशिन येऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु ही मशीन चालू करण्यावर कोणतेही उपाय करण्यात आले नाही. जुनी बंद असलेली मशीन दुरूस्त करण्यासंदर्भात वैद्यकीय अधिष्ठातांनी कोणतीही हालचाल केली नाही. किंवा नवीन मशीन सुरू करण्याची तयारीही दाखविली नाही. त्यामुळे येथील गोरगरीब रूग्णांशी मेडिकलला काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून येते. मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली सीटीस्कॅन मशीन दुरूस्त करण्यासाठी कुठलीच हालचाल करण्यात आली नसल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील गोरगरिब रुग्णांना आरोग्यविषयक दर्जेदार सुविधा मिळाव्यात त्यांना नागपूरपर्यंत पायपीट करावी लागू नये,यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने मेडिकल कॉलेजची स्थापन केली.मात्र याचा गोरगरीब रुग्णांना फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होत आहे. जिल्ह्याच्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी मेडिकलमध्ये येतात. परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना योग्य उपचार मिळत नाही. मेडिकल प्रशासनाच्या उदासिनतेमुळे रूग्णांचे हाल होत आहेत.खासगी रूग्णालयात मोजावे लागतात १२ हजारमेडिकलमधील सीटीस्कॅन मशीन सुरू नसल्याने मागील सहा महिन्यापासून रूग्णांना सीटीस्कॅन करण्यासाठी ११ ते १२ हजार रूपये मोजावे खासगी रुग्णालयात मोजावे लागत आहे. कोरोनाच्या काळात लोकांकडे पैसा नसताना त्यांनी सीटी स्कॅनकरीता एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आहे.आंदोलनाचा इशाराजिल्ह्यातील १४ लाख लोकांसाठी असलेल्या मेडिकलमध्ये सीटीस्कॅन मशीन नाही. त्यामुळे खासगी रूग्णालयात रूग्णांना धाव घ्यावी लागते. जीव वाचविण्यासाठी कर्ज काढून पैसे माजवे लागतात. वैद्यकीय अधिष्ठातांच्या उदासिनतेमुळे ही मशीन अद्याप दुरूस्त झाली नाही, असा आरोप शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पंकज यादव यांनी केला आहे.मशीन दुरूस्त करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल