शिक्षक संख्येचे गणित बिघडले; ३८ अतिरिक्त, ३७५ रिक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST2021-07-27T04:30:51+5:302021-07-27T04:30:51+5:30

गोंदिया : जिल्हा परिषद अंतर्गत ३० सप्टेंबर २०१८ ते १ जानेवारी २०२१ पर्यंत असलेल्या संच मान्यतेत गोंदिया जिल्हा परिषदेत ...

The math of teacher numbers went awry; 38 extra, 375 empty! | शिक्षक संख्येचे गणित बिघडले; ३८ अतिरिक्त, ३७५ रिक्त!

शिक्षक संख्येचे गणित बिघडले; ३८ अतिरिक्त, ३७५ रिक्त!

गोंदिया : जिल्हा परिषद अंतर्गत ३० सप्टेंबर २०१८ ते १ जानेवारी २०२१ पर्यंत असलेल्या संच मान्यतेत गोंदिया जिल्हा परिषदेत तीन हजार ९४१ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी तीन हजार ५६६ शिक्षक कार्यरत असून, ४१३ जागा रिक्त आहेत. परंतु अतिरक्त असलेल्या ३८ शिक्षकांना समायोजन केले तरी ३७५ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षक मिळेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

.................

कोट

शासनस्तरावरून पवित्र पोर्टलमार्फत भरतीची कारवाई सुरू आहे. रिक्त पदे शासनाकडून लवकरच भरण्याची कार्यवाही होत आहे.

- राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. गोंदिया

..........................

रिक्त पदे

मराठी शाळेतील- ३३९

हिंदी शाळेतील- ६९

..............

कुठल्या विषयाची किती रिक्त अतिरक्त

गणित-विज्ञान ---१२१----------००

भाषा---------------३४-----------००

कला----------------००-----------०४

सहाय्यक शिक्षक--१२७----------००

..............................

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

१) गोंदिया जिल्ह्यात बंगाली शिक्षक पाच कमी असल्याने बंगाली विषय मराठी शिक्षक शिकवू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

२) छत्तीसगड व मध्य प्रदेशला लागून गोंदिया जिल्हा असल्याने मोठ्या प्रमाणात हिंदी शाळा जिल्ह्यात आहेत. हिंदी शिक्षकांची ६९ पदे रिक्त आहेत.

३) मराठी शाळा सर्वाधिक असून, ३३९ शिक्षक मराठीचे कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

....................

शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात..

१) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा शासनाने लवकरात लवकर भराव्यात. विद्यार्थ्यांना विषयानुरूप शिक्षक उपलब्ध झाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- वीरेंद्र कटरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ.

........

२) शिक्षकांवर शैक्षणिक कामाबरोबर इतरही कामाची जबाबदारी टाकली जाते. याशिवाय शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असूनही डी.एड., बी.एड. केलेले बेरोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. शासनाने भरती घ्यावी.

- प्रकाश ब्राह्मणकर, विभागीय अध्यक्ष, शिक्षक भारती

Web Title: The math of teacher numbers went awry; 38 extra, 375 empty!