शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेटसाठी ३१ मार्च डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:22 IST

आरटीओं'ची सूचना; दंडात्मक कारवाईचाही उगारला जाणार बडगा : बनावटगिरीला लावणार चाप

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये छेडछाड किंवा बनावट नंबरप्लेटचा वापर करून अनेकदा गुन्हे केले जातात. त्याचबरोबर त्यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची ओळख पटत नाही. त्याचा विचार करून परिवहन विभागाने नंबरप्लेटमध्ये होणारी बनावटगिरी रोखून त्याचे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख तत्काळ पटावी या हेतूने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व वाहनधारकांना ती नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांवर कारवाईचाही बडगा उगारण्यात येणार आहे.

वाहनांचा वापर योग्य पद्धतीने करावा हा आरटीओचा नियम आहे. मात्र, अनेकदा वाहनांचा वापर हा अवैधरीत्या केला जातो. अनेकदा मुदतबाह्य वाहनेही रस्त्यावरून धावतात. तसेच बनावट नंबरप्लेट तयार करूनही त्या वाहनांचा वापर गुन्ह्यांसाठी केला जातो. 

त्या बनावट नंबरप्लेटवरून वाहनधारकांची ओळख पटत नाहीत. त्यामुळे संबंधित गुन्ह्यांतील संशयितांचा शोध लावणे कठीण जाते. अशा वाहनांमुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. त्याचा विचार करून परिवहन विभागाने आता नंबरप्लेटमध्ये होणारी बनावटगिरी रोखून त्याचे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख तत्काळ पटावी या हेतूने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व वाहनधारकांना ती नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांवर कारवाईचाही बडगा उगारण्यात येणार आहे.

अशी करावी लागेल कार्यवाही... केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार आता राज्यासह जिल्ह्यात सर्वच वाहनांना आता ही आधुनिक नंबरप्लेट बसवणे धनकारक केले आहे. प्रत्येक विभागनिहाय त्यासाठी आरटीओ विभागाने एजन्सी निश्चित केली आहे. एचएस- आरपी नंबरप्लेटसाठी बुकिंग करण्यासाठी http://maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेण्यात यावी.

"सर्व वाहनांना आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवणे बंधनकारक आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत आहे. त्या मुदतीत सर्व वाहनधारकांनी संबंधित एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्याव्या, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल." - राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :gondiya-acगोंदियाRto officeआरटीओ ऑफीस